जाहिरात

'अजितदादा आमच्यात आले नसते तर आम्ही 100 जागा जिंकल्या असत्या' शिंदेंचा शिलेदार थेट बोलला

गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधत ते जर महायुतीत आले नसते तर आम्ही 100 जागा जिंकल्या असत्या असं वक्तव्य केलं आहे.

'अजितदादा आमच्यात आले नसते तर आम्ही 100 जागा जिंकल्या असत्या' शिंदेंचा शिलेदार थेट बोलला
मुंबई:

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पण अजूनही महायुतीने सत्ता स्थापन केली नाही. अशात आता महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये मात्र कुरबुरी सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात निवडणुकीमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. ते काही थांबण्याचं चिन्ह दिसत नाही. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधत ते जर महायुतीत आले नसते तर आम्ही 100 जागा जिंकल्या असत्या असं वक्तव्य केलं आहे. त्याला गुलाबराव जुलाबराव होऊ नका असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी दिले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकनाथ शिंदे यांनी विधान सभेत सांगितलं होतं माझ्या बरोबर आलेला एकही आमदार पडू देणार नाही. चार ते पाच अपवाद वगळता शिंदेंनी सर्व आमदार निवडून आणले असं गुलाबराव पाटील म्हणाले. सर्वांच्या छाताडावर उभं राहून त्यांनी भगवा गाडला आहे. त्यांनी शिवसेनेचा नावलौकीक करून दाखवला आहे. अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. नाही तर काही जण अडिच वर्ष घरात बसून होते असं गुलाबराव यांना उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हटलं. 

ट्रेंडिंग बातमी - 'सरकार कुणाचंही असलं तरी मुंडक्यावर पाय देऊन...' जरांगे पाटील हे काय बोलले?

विधानसभा निवडणुकीत आमच्या वाट्याला केवळ 85 जागा आल्या. जर अजित पवार महायुतीत आले नसते तर त्यांच्या वाट्याच्या जागा आम्हाला आल्या असत्या. त्यानंतर आम्ही जवळपास 90 ते 100 जागा जिंकल्या असत्या असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. अजित पवार महायुतीत आले. त्यावेळी ही एकनाथ शिंदे शांत राहीले. त्यांनी कोणताही विरोध दर्शवला नाही. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही पलटवार केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.    

ट्रेंडिंग बातमी - भाजपने आधी ठाकरेंना फसवलं आता एकनाथ शिंदेंची फसवणूक, बड्या नेत्याचा बडा आरोप

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे मधूनच का उफाळून येतं माहीत नाही. या निवडणुकीत शिंदे,फडणवीस आणि अजितदादांनी मेहनत घेतली. त्यामुळेच सत्ता आली हे नाकारून चालणार नाही. एकनाथ शिंदेंचं त्यातलं योगदान हे मोठं आहे. पण अजित पवारांचा वाटाही मोठा आहे असं अमोल मिटकरी म्हणाले. तिघांनी मिळून सत्ता आणली आहे. असं असताना अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे गुलाबरावांनी नावा सारखे रहावे. त्यांचा सुगंधी हा कमी झाला आहे. मंत्रिमंडळात संधी मिळेल की नाही हे त्यांना माहित नाही त्यामुळे कदाचित ते असं बोलत असावेत. त्यामुळे गुलाबरावांनी गुलाबरावांसारखे रहावे जुलाबराव होवू नये असा सल्ला मिटकरी यांनी दिला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com