1500 रुपयांच्या ईदीच्या भेटीसाठी कुटुंबाचा भयंकर शेवट; पतीने पत्नीसह दोन्ही मुलांना दिलं विष अन् स्वत:..

Muzaffarnagar News: बराच वेळ दार ठोठावूनही कुणी आवाज न दिल्याने इरशादचा भाऊ इनामसह अन्य लोक दरवाजा तोडून आत शिरले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Muzaffarnagar Crime News: उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये बहिणीला दिलेल्या १५०० रुपयांच्या ईदीवरुन झालेल्या वादात संपूर्ण कुटुंबाचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात झालेल्या भांडणानंतर पतीने दोन मुलांसह पत्नीला विष दिलं आणि गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी ३१ मार्चच्या सकाळी त्यांच्या खोलीचं दार उघडलं नाही. शेजारच्यांनी दार तोडून पाहिलं तर तीन मृतदेह जमिनीवर पडलेले होते आणि मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. एका घरात चार जणांच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवले. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक माहिती सरवट भागातून समोर आल्याची माहिती आहे. ईदच्या निमित्ताने इरशादने (३०) आपल्या विवाहित बहिणीला १५०० रुपयांची ईदी दिली होती. याबाबत इरशादची पत्नी नौरिनला (२५) कळताच घरात जोरदार भांडण सुरू झालं. सोमवारी ३० मार्चला इरशादची आई आणि बहिणीनेही घरी येत इरशादसोबत खूप भांडण केलं. ज्यानंतर रात्री उशीरापर्यंत इरशादचं पत्नीसोबत खूप भांडण झालं. ३१ मार्चच्या सकाळी बराच उशीरापर्यंत त्यांच्या खोलीतून कोणीही बाहेर आलं नाही, आवाज दिल्यानंतरही कोणी उत्तर दिलं नाही. 

Advertisement

Muzaffarnagar Man killed Wife And Childs Then Commit Suicide

दरवाजा तोडून आत शिरताच सर्वांना बसला धक्का...

बराच वेळ दार ठोठावूनही कुणी आवाज न दिल्याने इरशादचा भाऊ इनामसह अन्य लोक दरवाजा तोडून आत शिरले. त्यानंतर घरातील दृश्य पाहून सर्वजण हैराण झाले. इरशाद गळफास घेतलेल्या अवस्थेत होता, तर पत्नी नौरिनसह एक महिन्याची मुलगी अक्सा आणि दोन वर्षांचा मुलगा आहिलचा मृतदेह जमिनीवर होता. प्राथमिक तपासानुसार, इरशादने आधी आपल्या पत्नी आणि मुलांना विष दिलं. ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.  

इरशाद के घर के बाहर लगी लोगों की भीड़.

भावाने सांगितलं नेमकं काय घडलं?

इनामने सांगितलं की, इरशाद मजुरीवर काम करीत होता. तो दोन मुलं आणि पत्नीसोबत राहत होता. त्याने त्याच्या बहिणीला १५०० रुपये ईदी दिली होती. त्याच्या बहिणीचा मुलगा आजारी होता. त्याला दाखविण्यासाठी ती माहेरी आली होती. या पैशातून वाद निर्माण झाला. इरशादने न विचारचा पैसे दिलेलं नौरिनला आवडलं नव्हतं. यातून झालेल्या वादाचा भयंकर परिणाम झाला.