अमेरिकेतील Newsweek या प्रसिद्ध मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान दिले आहे. या मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळणारे नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींनंतरचे दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत. या मासिकाने पंतप्रधान मोदी यांची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत आपले विचार मांडले आहेत. भारताच्या भविष्यासाठीच्या योजनांबाबतही त्यांनी मुलाखतीमध्ये उत्तरे दिली. चीनसोबतचे संबंध भारतासाठी महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारत चीन सीमेवरील परिस्थितीकडे तातडीने पाहण्याची गरज असल्याचे मला वाटते असे मोदी यांनी म्हटले आहे. जेणेकरून भारत-चीन या दोन देशांत सुरू असलेल्या चर्चेतील असामान्य परिस्थिती संपुष्टात येईल. भारत आणि चीनमधील स्थिर आणि शांततापूर्ण संबंध केवळ या दोन देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहेत असे मोदी यांनी सांगितले. उभय देशांतील सकारात्मक चर्चेतून सीमेवर पुन्हा शांतता आणि स्थिरता बहाल करण्यात आम्ही यशस्वी होऊ असे त्यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि चीन हे अनेक संघटनांचे सदस्य आहेत. 'क्वाड' ही संघटना कोणत्या देशाविरोधात नसून शांघाय सहकार्य संघटना, ब्रिक्स आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांप्रमाणे, क्वाड हा देखील समविचारी देशांचा समूह आहे. ही संघटना समान विचारधारेवर चालणाऱ्या देशांची संघटना असून ती एका सकारात्मक अजेंड्यावर काम करत आहे. पंतप्रधान म्हणाले की, इंडो-पॅसिफिक क्षेत्र हे जागतिक व्यापार, नवकल्पना आणि विकासासाठीचे इंजिन आहे आणि इंडो-पॅसिफिकची सुरक्षा केवळ या क्षेत्रासाठीच नाही तर जगासाठी महत्त्वाची आहे. पाकिस्तानबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटले की मी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल तिथल्या पंतप्रधानांचे अभिनंदन केले होते. आपल्या क्षेत्रात शांतता नांदावी, हिंसाचारमुक्त वातावरण निर्माण व्हावे, सुरक्षा आणि समृद्धी वृद्धींगत व्हावी यासाठी भारताने सातत्याने प्रयत्न केले आहेत. इम्रान खान यांच्या अटकेसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानातील अंतर्गत स्थितीबाबत मी भाष्य करणार नाही.
इंदिरा गांधींनंतर मोदी, 58 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानाबाबत जुळला 'हा' योग
अमेरिकेतील Newsweek या प्रसिद्ध मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान दिले आहे. या मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळणारे नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींनंतरचे दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत.
जाहिरात
Read Time:
2 mins
पाकिस्तानबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटले की मी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल तिथल्या पंतप्रधानांचे अभिनंदन केले होते.
नवी दिल्ली:
Topics mentioned in this article