झारखंडच्या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठं यश संपादन केलं आहे. लातेहारमध्ये सुरक्षा दलाने एक वरिष्ठ माओवादी नेत्याचा खात्मा केला आहे. ही कारवाई छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये मोठा माओवादी नेता नंबाला केशव उर्फ बसवराजूच्या एन्काऊंटरच्या दोन दिवसांनंतर करण्यात आली आहे. दहा लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी नेता पप्पू लोहारा याचा खात्मा करण्यात आला आहे. तो विद्रोही माओवादी संघटना झारखंड जन मुक्ती परिषदेचा नेता होता. या कारवाईत सुरक्षा दलाने त्याचा सहकारी प्रभात गंझूलाही संपवलं गंझूवर पाच लाखांचं बक्षीस होतं.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लातेहारचे एसपी कुमार गौरव यांना माओवाद्यांच्या कारवाईबाबत गुप्त सूचना मिळाली होती. झारखंड जन मुक्ती परिषदेचा सुप्रीमो पप्पू लोहरा हा ठाणे परिसरातील सालइया जंगलात मोठा कारवाई करण्याच्या तयारीत होता. याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाच्या टीमने सलईयाच्या जंगलात शोध अभियान सुरू केलं होतं. यादरम्यान पोलिसांना पाहून नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. या चमकतीत जेजे एमपी सुप्रीमो पप्पू लोहरा आणि प्रभात लोहरा याला कंठस्नान घातलं. चकमकीनंतर शोध अभियान सुरू आहे.
नक्की वाचा - नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले DRG कोण आहेत? नक्षलवादी थरथर का कापतात?
बसवराजूनंतर आणखी एक मोठा नक्षलवादी ठार...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या या कारवाईत नक्षलवादी गटातील आणखी एक सदस्य जखमी जाला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळ एक इन्सास रायफल सापडली आहे. ही चकमक छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील बसवराजूला ठार केल्याच्या तीन दिवसांनंतर झाली होती. बसवराजू नारायणपूर बिजापूर बॉर्डरवर ५० तासांहून अधिक वेळ चालली. यामध्ये २७ माओवादी मारले गेले होते.