Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये 16 नक्षलवाद्यांचा खात्मा, कोल्हापूरच्या अधिकाऱ्याची मोठी कामगिरी

छत्तीसगडच्या सुकमाच्या केरळपाल भागातील गोगुंडा टेकड्यांमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

जाहिरात
Read Time: 1 min

Naxalite encounter : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांची मोठी कारवाई सुरू आहे. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात केरलापाकच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. मृत नक्षलवाद्यांचा आकडा 16 पेक्षा जास्त असल्याची सूत्रांची माहिती. या चकमकीत सुरक्षा दलाचं नेतृत्व मूळचे कोल्हापूरचे असलेले पोलीस अधिकारी आणि सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण करीत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या चकमकीत 16 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. यावेळी घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे सापडली आहेत. इन्सास, SLR सारखी शस्त्र यात असल्यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये काही बड्या  नक्षलवादी नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा - Kalyan News: 2 कोटींच्या खंडणीसाठी रिक्षा चालकाने केले सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या सुकमाच्या केरळपाल भागातील गोगुंडा टेकड्यांमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये 30-40 नक्षलवादी होते. या चकमकीत 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडल्याचे वृत्त आहे. दोन सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान अद्यापही परिसरात शोध मोहीम सुरू आहे.