NDTV Exclusive: 'त्या' विमानाचा एक पार्ट नादुरूस्त होता? अहमदाबाद विमान अपघाताचा अहवाल 48 तासात येणार

सर्वांच्या नजरा एएआयबीच्या प्राथमिक अहवालावर आहेत, जो विमान अपघातानंतर 30 दिवसांच्या आत, म्हणजेच पुढील 48 तासांत सार्वजनिक केला जाईल.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

हवाई वाहतूनक मंत्रालयाच्या (Civil Aviation Ministry) एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने संसदेच्या वाहतूक, पर्यटन आणि संस्कृतीशी संबंधित स्थायी समितीला अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीतील आतापर्यंतची माहिती दिली आहे. एनडीटीव्हीला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, समितीसमोर अनेक महत्त्वपूर्ण तथ्ये सादर करण्यात आली आहेत. भारतात झालेल्या विमान अपघाताची इतक्या सविस्तर पणे चौकशी पहिल्यांदाच केली जात आहे. इतिहासात असं पहिल्यांदाच होत असल्याचं या चौकशी समितनं म्हटलं आहे. 

या बैठकीत एएआयबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ब्लॅक बॉक्स पूर्णपणे सुरक्षित स्थितीत सापडला आहे. त्याची माहिती अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड (NTSB) च्या तांत्रिक मदतीने डीकोड करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, सुरक्षिततेला प्राधान्य देत दोन्ही ब्लॅक बॉक्स वेगवेगळ्या विमानांतून पाठवण्यात आले आहे. या ब्लॅकबॉक्समधील डेटाची सुरक्षा राहावा यासाठी असे करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

नक्की वाचा - Pune Exclusive: मुस्लीम कुटुंबावर बहिष्कार, अनेकांनी गाव सोडलं, व्यवसायही ठप्प, कारण काय?

तांत्रिक माहितीची प्रत्येक गोष्ट  एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सोबत झालेल्या संवादाशी जुळवून पाहिला जात आहे. त्यावरून  विमानाच्या सिस्टिममध्ये कोणतीही तांत्रिक बिघाड तर नव्हता ना याची काटेकोर तपासणी केली जात आहे. याव्यतिरिक्त, विमानाचा ढिगारा त्याच्या मूळ उपकरण उत्पादकांना (OEMs) पाठवला जात आहे, जेणेकरून कोणताही सुटा भाग आधीपासून सदोष (डिफेक्टिव्ह) नव्हता हे तपासता येणार आहे. 

नक्की वाचा - Farmers News: धक्कादायक! 'या' कारणाने 6 महिन्यांत पश्चिम विदर्भात 527 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बैठकीदरम्यान डीजीसीए (DGCA), एएआय (AAI), एअर इंडिया, इंडिगो आणि पवन हंस लिमिटेडच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी हवाई सुरक्षितता सुधारण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली. डीजीसीएने विस्तृत सादरीकरणात देशात हवाई प्रवास सुरक्षित करण्यासाठी लागू केलेल्या नवीन उपायांची माहिती दिली, तर एएआयने विमानतळ सुरक्षिततेसाठी उचललेली पाऊले सांगितली. संसदीय समितीच्या या महत्त्वाच्या बैठकीत एका खासदाराने हा मुद्दाही उपस्थित केला की, रेल्वे सुरक्षा आयोग (CRS) रेल्वे सुरक्षा पाहतो, परंतु तो प्रशासकीय दृष्ट्या नागरिक उड्डयन मंत्रालयाच्या अंतर्गत का येतो असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

Advertisement

नक्की वाचा - Kangana Ranaut: "खासदार असून लोक रस्ते-नाल्यांच्या तक्रारी घेऊन येतात", कंगना रणौत काय म्हणाली?

आता सर्वांच्या नजरा एएआयबीच्या प्राथमिक अहवालावर आहेत, जो विमान अपघातानंतर 30 दिवसांच्या आत, म्हणजेच पुढील 48 तासांत सार्वजनिक केला जाईल. हा अहवाल एएआयबीच्या वेबसाइटवर अपलोड केला जाईल. त्यात अपघाताचे कारण काय होते हे सांगितले जाईल.  म्हणजेच तो कोणत्याही निष्कर्षाशिवाय सोडला जाणार नाही. त्यात अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच या अहवालाची प्रतिक्षा आहे.