
- कंगना रनौत ने मार्च दो हजार चौबीस में भाजपा में शामिल होकर हिमाचल प्रदेश के मंडी से सांसद के रूप में राजनीति में कदम रखा था.
- उन्होंने एक पॉडकास्ट में स्वीकार किया कि राजनीति उनके लिए नई और चुनौतीपूर्ण क्षेत्र है, जिसमें उन्हें अभी भी अपनी जगह बनानी है.
- कंगना ने कहा कि राजनीति में उन्हें मजा नहीं आ रहा है और यह काम समाज सेवा जैसा है, जो उनकी पृष्ठभूमि से अलग है.
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने राजकारणात प्रवेश केला, मात्र ती यात समाधानी दिसत नाही. तिच्या अलीकडील वक्तव्यांवरून तरी हेच दिसून येत आहे. कंगनाने एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे की तिला एक ऑफर कशी मिळाली आणि नंतर ती राजकारणात कशी सामील झाली. कंगना सध्या हिमाचल प्रदेशातील मंडी येथून खासदार आहे. कंगना मार्च 2024 मध्ये भाजपमध्ये सामील झाली.
कंगना राणौतने मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाली आणि तिच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. कंगनाने कबूल केले आहे की ती अजूनही राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
पॉडकास्टदरम्यान कंगनाला विचारण्यात आले की ती राजकारणाचा आनंद घेत आहे का? यावर कंगनाने उत्तर दिले, "मला त्याची सवय होत चालली आहे. मी असं म्हणणार नाही की मला ते आवडतंय. हे एक वेगळ्या प्रकारचे काम आहे, जसे की समाजसेवा, पण ती माझी पार्श्वभूमी नव्हती. मी कधीही लोकांची सेवा करण्याचा विचार केला नव्हता."
" महिलांच्या हक्कांसाठी मी लढले आहे, पण ती वेगळी बाब आहे. लोक रस्ते आणि गटारांच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात. पण मी खासदार आहे आणि हे लोक पंचायत पातळीवरील समस्या घेऊन माझ्याकडे येत आहेत. लोक रस्त्यांसारख्या समस्या घेऊन येतात आणि जेव्हा मी त्यांना सांगते की ही राज्य सरकारची बाब आहे, तेव्हा ते म्हणतात, तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही तुमचे पैसे वापरा", असंही कंगना म्हणाली.
पॉडकास्ट दरम्यान कंगनाला तुला पंतप्रधान व्हायला आवडेल का? यावर तिने म्हटलं की, मला वाटत नाही मी या भूमिकेसाठी पुरेशी पात्र आहे. कारण सामाजिक कार्य तिच्या पार्श्वभूमीत कधीच नव्हते. तिने सांगितले की ती खूप स्वत:साठी जीवन जगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world