अग्निवीर अजय कुमार सिंहच्या (Agniveer Ajay Kumar Singh) कुटुंबीयांना सैन्याकडून भरपाईची रक्कम मिळाली नाही, असा आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला होता. जानेवारी 2024 साली जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या सुरुंगाच्या स्फोटात अजय कुमार यांचा मृत्यू झाला होता. NDTV नं राहुल गांधी यांच्या या दाव्याची पडताळणी केली आहे.
पंजाबमधील खन्ना या गावचे रहिवाशी असलेल्या अजय कुमार यांच्या वडिलांनी NDTV ला याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं, 'पैसे तर मिळाले आहेत.पण, अग्निवीर योजना बंद झाली पाहिजे. सैनिकांना जसं पेन्शन मिळतं, तसंच मिळालं पाहिजे. अग्निवीर योजनेनुसार होणारी भरती बंद करायला हवी. अजय कुमार यांना हुतात्माचा दर्जा मिळालेला नाही. त्याला हुतात्माचा दर्जा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.'
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमचा मुलगा परत द्या, अन्यथा...
अजय कुमारच्या आईंनी एनडीटीव्हीला सांगितलं, 'हुतात्माचा दर्जा दिला नाही. हुतात्माचा दर्जा द्यायला हवा. पैसे घेऊन काय करणार? पैसे नकोत, आमचा मुलगा परत द्या, अन्यथा त्याला हुतात्माचा दर्जा द्या.' अजय कुमारवर मोठी जबाबदारी होती. त्याला 6 बहिणी आहेत. आमचा वंश समाप्त झाला आहे,' असं त्यांनी पुढं सांगितलं.
अजय कुमारच्या मोठ्या बहिणीला त्यांच्या एकुलत्या एक भावाच्या हौतात्म्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितलं, 'अन्य नियमित सैनिकांना हुतात्माचा दर्जा मिळतो,तोच मिळायला हवा. अग्निवीर योजना बंद केली पाहिजे. अग्निवीर योजनेत कोणतेही पेन्शन नाही. रेशन कार्ड नाही.'
( नक्की वाचा : बालबुद्धी, शोले की मौसी... PM मोदींनी राहुल गांधींवर केलेल्या थेट हल्ल्यातील 5 प्रमुख मुद्दे )
राहुल गांधींनी विचारला होता प्रश्न
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणवरील चर्चेत भाग घेताना अग्निवीर योजनेबाबत अनेक प्रश्न विचारले होते. अग्निवीरांना मोदी सरकार 'हुतात्मा' दर्जा देत नाही. त्यांच्या कुटुंबाला कोणतीही भरपाई मिळत नाही.'
राहुल गांधींच्या आरोपांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलं होतं. 'आपल्या सीमेचं संरक्षण करताना किंवा युद्धात हुतात्मा झालेल्यांना अग्निवीरांच्या कुटुंबांना एक कोटींची आर्थिक मदत दिली जाते,' असं संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : 'हिंदूं'वरुन गांधी-मोदींमध्ये खडाजंगी, लोकसभेत नेमकं काय झालं? )
सैन्याकडून किती रक्कम मिळाली?
सैन्याकडूनही याबाबत स्पष्टीकरण करण्यात आलंय. भारतीय सेना अग्निवीर अजय कुमार यांच्या सर्वोच्च बलिदानाला वंदन करते. कर्तव्यावर असताना जीव गमावणारे अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबाला भरपाई मिळालेली नाही, या आशयाच्या पोस्ट निराधार आहेत. या कुटुंबाला 98.39 लाख रुपयांची आर्थिक मदत यापूर्वीच दिलेली आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीची एकूण रक्कम 1.65 कोटी रुपये होईल. अग्निवीर योजनील नियमांनुसार जवळपास 67 लाखांची रक्कम, अन्य लाभ लवकरच त्यांच्या कुटुंबीयांना मिळतील, असं सैन्यानं स्पष्ट केलंय.