NDTV च्या 'महाकुंभ कॉन्क्लेव्ह'मध्ये दिव्य ज्योती जागृती संस्थेचे कार्यक्रम समन्वयक प्रमुख स्वामी विशाल आनंद देखील सहभागी झाले होते. स्वामी विशाल आनंद यांनी कुंभमेळ्यावर बोलताना विश्वचषकासारख्या इतर कार्यक्रमांचे उदाहरण देत त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसून येतात असं म्हटलं. "कुंभमेळा फक्त एवढ्यावरच संपत नाही. येथे नवीन नातेसंबंध तयार करणे. जिथे नवीन संबंध तयार होतात आणि नवीन चर्चा होतात. नवीन कोलॅबोरेशन होतात. या सर्व गोष्टी सतत घडत असतात आणि वाढत असतात. महाकुंभमुळे भारताच्या आध्यात्मिक पर्यटनाला नवी चालना मिळेल", असंही स्वामी विशाल आनंद यांनी म्हटलं.
कुंभमेळ्यादरम्यान लोकांच्या हरवण्याच्या चर्चांवर स्वामी विशाल आनंद म्हणाले की, "हे एक नॅरेटिव्ह आहे. मेळ्याचा अर्थच भेटणे असा आहे. महाकुंभ हे भारताच्या आध्यात्मिक वैभवाचे प्रतीक मानले जाते." गेल्या काही वर्षांत अध्यात्माशी संबंधित व्यवसाय खूप वाढला आहे. तो आणखी कसा विस्तारू शकेल? या प्रश्नाला उत्तर देताना स्वामी विशाल आनंद म्हणाले की, "तुम्ही याला व्यवसाय म्हणता पण ती आपली संस्कृती आहे. कुंभमेळ्यात जाण्यासाठी बड्या महात्म्यांना बोलावणे, तंबू उभारणे, तंबू भाड्याने देणे, अनेकांना व्यवसाय म्हणून कथा सांगणे हा सगळा पर्यटनाचा भाग आहे, याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे."
(नक्की वाचा- Mahakumbh Conclave : महाकुंभमेळ्यात स्वच्छता कशी राखणार? तज्ज्ञांनी दिलं उत्तर)
भारताच्या या परंपरेशी जोडून रोजगार कसा वाढवता येईल? हे पुढे कसे नेता येईल? त्याला उत्तर देताना स्वामी विशाल आनंद म्हणाले की, "महाकुंभातून अनेकांना रोजगार मिळत आहेत. पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या 45 दिवसांच्या कार्यक्रमासाठी देशभरात 13 हजार नवीन गाड्या चालवण्यात आल्या आहेत. याला डिजिटल कुंभ म्हटले जात असेल तर त्याचा अर्थ केवळ संगणक नाही. रेल्वे सेवा पुरवण्यासाठी तंत्रज्ञानाचे संपूर्ण नेटवर्क उभारण्यात आले आहे, जेणेकरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढेल. उत्तर प्रदेशात एक राज्य महामार्गही बनवण्यात आला आहे. अनेक लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे यात जोडले गेले आहेत. ही संपूर्ण सप्लाय चेन आहे, असंही स्वामी विशाल आनंद यांनी सांगितलं."
(नक्की वाचा- NDTV Mahakumbh Conclave: 'कुंभमेळ्यात आर्थिक मंथनाची संधी', 'योगी सरकार'च्या तयारीची मंत्री असीम अरुण यांनी दिली माहिती)
"हॉटेल्स, ट्रेन्स आणि एअरलाइन्सच्या सप्लाय चेनमध्ये किती नवीन लोक सामील होत आहेत.विकास होतो तेव्हा तो संपत नाही. एका आयएएस अॅकॅडमीच्या अहवालानुसार, यावेळच्या महाकुंभात अडीच ते तीन लाख कोटींचा व्यवहार होणार आहे. यावर सरकार 25-30 हजार कोटी रुपयांचा कर आकारणार आहे. या रकमेतून सरकारला गुंतवणूक नक्कीच परत मिळेल", असाही स्वामी विशाल आनंद यांनी दावा केला.