NDTV Mahakumbh Conclave: 'कुंभमेळ्यात आर्थिक मंथनाची संधी', 'योगी सरकार'च्या तयारीची मंत्री असीम अरुण यांनी दिली माहिती

NDTV Mahakumbh Conclave: असीम अरुण यांनी पुढे म्हटलं की, कुंभचा महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रयागराजच्या पायाभूत सुविधा कायमस्वरूपी चांगल्या होत आहेत. यावेळी कुंभमेळ्यात पर्यावरणावर खास लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

उत्तर प्रदेशचे समाजकल्याण मंत्री असीम अरुण NDTV च्या 'महाकुंभ कॉन्क्लेव्ह'मध्ये सहभागी झाले होते. कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या तयारीची माहिती असीम अरुण यांनी यावेळी दिली. "योगी सरकारने अशी व्यवस्था केली आहे की कोणताही सामान्य व्यक्ती आपल्या कुटुंबासह संगमावर सहज पोहोचू शकतो आणि स्नान करू शकतो. योगी सरकारच्या मूलभूत कामामुळे हे शक्य झाले आहे. त्याचे आर्थिक परिमाणही खूप महत्त्वाचे आहेत", असं असीम अरुण यांनी सांगितलं. 

महाकुंभच्या भव्य आणि डिजिटल झाल्याने रोजगार निर्मितीचा मुद्दा आणि त्यामुळे निवडणुकीत किती फरक पडेल यावर असीम अरुण म्हणाले की, "पीएम मोदी आणि सीएम योगी यांनी कुंभमध्ये प्रत्येकासाठी योग्य व्यवस्था केली आहे. 500 रुपये कमावणारी व्यक्तीही कुंभमध्ये जाऊ शकते आणि ग्लॅमरस तंबूची सुविधा देखील घेऊ शकते." 

"कुंभची संपूर्ण कथा समुद्रमंथनाने सुरू होते. व्यवसायात असे म्हटले जाते की पैसा जितका फिरतो, आर्थिक मंथन होते ते आर्थिकदृष्ट्या चांगले आहे. केंद्र आणि राज्य सरकार यासाठी थेट 6,500 कोटी रुपये खर्च करत आहे. हा खर्च पायाभूत सुविधा आणि वाहतुकीवर केला जात आहे. कुंभ संदर्भात CIA च्या 2019 च्या अहवालानुसार, 1.2 लाख कोटी रुपयांची कमाई झाली. सध्या सुमारे 1.5-2 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. कुंभ हा आर्थिक मंथनाचाही स्त्रोत आहे", असं असीम अरुण यांनी म्हटलं.

असीम अरुण यांनी पुढे म्हटलं की, "कुंभचा महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रयागराजच्या पायाभूत सुविधा कायमस्वरूपी चांगल्या होत आहेत. यावेळी कुंभमेळ्यात पर्यावरणावर खास लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. गंगा-यमुनामध्ये एक थेंबही द्रव कचरा टाकला जात नाही. परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे." 

पर्यटकांना आकर्षित करण्यात उत्तर प्रदेश नंबर वन

"उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश वेगळे झाले तेव्हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता की, उत्तर प्रदेश पर्यटनपासून दूर होईल. मात्र आज परिस्थिती अशी आहे की, पर्यटकांना आकर्षित करण्यात उत्तर प्रदेश नंबर वन आहे. प्रयागराज आणि कुंभ हे त्याचे मोठे कारण आहे. काशीला वर्षभर पर्यटक येतात. कुंभमेळ्यामुळे पर्यटकांची संख्या आणखी वाढेल. त्यासाठी 7 हजार नवीन बसेस चालवल्या जात आहेत. या सर्व बसेस इलेक्ट्रिक आहेत. कुंभनंतर या बसेस संपूर्ण राज्यात सेवा देतील ही व्यवस्था कायमस्वरूपी असून कुंभानंतरही सुरू राहणार आहे", असं देखील असीम अरुण यांनी सांगितलं.