NEET Paper Leak: बाप आरोपी अन् घरात 5-5 डॉक्टर; नीट पेपर लीक प्रकरणातील 'या' कुटुंबाचं धक्कादायक वास्तव

NEET Paper Leak:  या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या एकाच कुटुंबातील तब्बल 5 मुले डॉक्टर बनण्याच्या मार्गावर आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
NEET Paper Leak: या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट झाला आहे.
मुंबई:

NEET Paper Leak:  देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET-2026 पेपर लीक प्रकरणाने आता एक अतिशय धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या राजस्थानच्या जयपूरमधील एकाच कुटुंबातील तब्बल 5 मुले डॉक्टर बनण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे.त्याचवेळी हे संपूर्ण कुटुंब सीबीआयच्या रडारवर आले आहे. एकाच घरातील इतकी मुले मेडिकलला कशी पोहोचली आणि यामागे पेपर लीकचे जाळे तर नाही ना, या शंकेने तपास यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.

काय आहे प्रकरण?

सीबीआयने केलेल्या चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपी दिनेश आणि मांगीलाल यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी नीट परीक्षा उत्तीर्ण करून नामांकित मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवला होता. यामध्ये दिनेशची मुलगी गुंजन हिला बनारस मेडिकल कॉलेज मिळाले होते. तर मांगीलालचा मोठा भाऊ घनश्याम याच्या मुली पलक आणि सोनिया यांनीही नीट क्रॅक केली होती.

Advertisement

सोनिया सध्या मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेत आहे. इतकेच नाही तर मांगीलालची मुलगी प्रकृती दौसा मेडिकल कॉलेजमध्ये आणि विकास सवाई माधोपुर मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहे. एकाच कुटुंबातील इतक्या मुलांचे यश आता सीबीआयसाठी तपासाचा मुख्य विषय ठरला आहे.


( नक्की वाचा : NEET Paper Leak : रात्री 11 चा 'तो' मेसेज अन् संपूर्ण 'नीट' परीक्षा रद्द! हॉस्टेल मालकाने नेमकं काय पाहिलं? )
 

कसे होते पेपर लिकचे जाळे?

हा पेपर लीकचा व्यवहार एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा आहे. या प्रकरणाच्या तपासात समोर आले की, हे संपूर्ण नेटवर्क गेल्या अनेक वर्षांपासून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत होता. अहिल्याबाई नगरमधील धनंजयकडून हा पेपर नाशिकच्या शुभम खैरनारपर्यंत पोहोचला. तिथून तो हरियाणाच्या यश यादवकडे गेला. 

यश यादवने यापूर्वी सीकरमध्ये राहून नीटची तयारी केली होती, तिथेच त्याची ओळख विकाससोबत झाली. या ओळखीचा फायदा घेत दीपावलीच्या सुमारासच यशने विकास आणि मांगीलाल यांना पेपर मिळवून देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर दिनेशने आपल्या मुलासाठी आणि पुतण्यासाठी मोठी रक्कम देऊन हा पेपर मिळवल्याचा आरोप आहे.

( नक्की वाचा : NEET paper leak : नाव मेडिकलला, पण कनेक्शन पेपर लीकच्या टोळीशी! नाशिकच्या शुभम खैरनारची 'कुंडली' आली समोर )

कसे फुटले बिंग?

तपास यंत्रणांच्या मते, हा संपूर्ण प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा आरोपींनी अधिक पैशांच्या लालसेपोटी हा पेपर पुढे विकायला सुरुवात केली. आरोपी ऋषीने राकेश मंडावरियाच्या माध्यमातून हा पेपर मोठ्या स्तरावर पसरवला. परीक्षेच्या अवघ्या 15 तास आधी सीकरमधील वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर पोहोचला. पेपर लीकची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि प्रकरण थेट तपास यंत्रणांकडे पोहोचले.

Advertisement

पुढे काय होणार?

सध्या सीबीआयचा मुख्य फोकस पेपर लीक करणाऱ्या त्या मोठ्या साखळीवर आहे, ज्यांनी हा पेपर विविध राज्यांमधून फिरवत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. सीकरचा रहिवासी राकेश मंडावरिया याची सध्या कसून चौकशी सुरू असून, त्याला सरकारी साक्षीदार बनवले जाण्याची शक्यता आहे. 

या प्रकरणात अडकलेल्या अनेक विद्यार्थी आणि पालकांची चौकशी करण्यात आली असून, गरज पडल्यास त्यांना पुन्हा पाचारण केले जाणार आहे. जम्मारामगड भागातील इतरही काही विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर पोहोचल्याची माहिती सीबीआयला मिळाली असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
 

Advertisement