NEET-UG परीक्षेचे पेपर 30-40 लाखांना विकले गेले; 13 जणांना अटक

एनडीटीव्हीला मिळालेल्या माहितीनुसार, पटनामध्ये पोलिसांना 5 मे रोजी पहिल्यांदा गडबडीची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी परीक्षा केंद्राजवळ असणाऱ्या तीन जणांना अटक केली.

Advertisement
Read Time: 2 mins


नीट पेपरफुटी प्रकरणी बिहार पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनडीटीव्हीला मिळालेल्या एक्स्क्लुझिव्ह माहितीनुसार, नीट यूजीचा पेपर 30-40 लाख रुपयांना विकला गेला. या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आता केंद्र सरकारने हे प्रकरणी सीबीआयकडे सुपूर्द केलं आहे. सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

एनडीटीव्हीला मिळालेल्या माहितीनुसार, पटनामध्ये पोलिसांना 5 मे रोजी पहिल्यांदा गडबडीची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी परीक्षा केंद्राजवळ असणाऱ्या तीन जणांना अटक केली. यातील एकावर विद्यार्थ्यांना पेपर पुरवल्याचा आरोप आहे. सिकंदर कुमार याजवेंदू असं या आरोपीचं नाव आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, सिकंदर झारखंडमध्ये राहून देशातील अनेक राज्यांमध्ये त्याची गँग चालवतो. सिकंदरच्या लोकांना पालकांसोबत एका हॉटेलमध्ये मीटिंग केली होती आणि तिथेच पैशांची बोलणी देखील झाली होती. 

Advertisement

खासगी कुरिअर कंपनीवरही शंका

पोलिसांच्या शंका आहे की नीट पेपरफुटीप्रकरणात एका खासगी कुरिअर कंपनीचा देखील समावेश आहे. पोलीस सर्व तपास करत पुढे जात आहे. कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन हा पेपर लीक केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र चौकशी पूर्ण झाल्याशिवाय काहीही ठोस सांगता येणार नाही. 

सूत्रांच्या माहितीनुसार, NEET परीक्षेची प्रश्नपत्रिक रांची विमानतळावर पोहोचली आणि त्यांनतर कुरिअर कंपनीने ते पार्सल हजारीबाग येथे पोहोचवलं. पोलिसांना संशय आहे की या प्रवासदरम्यानच पेपर लीक झाला असावा. हजारीबागमध्ये प्रश्नपत्रिक SBI च्या लॉकरमध्ये ठेवण्यात आली होती. तिथेच नीट परीक्षा केंद्र देखील होतं. 

Advertisement
Topics mentioned in this article