NEET Topper Tanmay Gupta Interview: देशातील सर्वात मोठी मेडिकल प्रवेश परीक्षा नीट पेपरफुटीनंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता तब्बल २२ लाखांच्या विद्यार्थ्यांना २१ जून रोजी दुसऱ्यांदा नीट परीक्षा द्यावी लागेल. यासाठी विद्यार्थी पुन्हा एका तयारी करीत आहेत. मात्र अनेक विद्यार्थी असेही आहेत, ज्यांना पुन्हा उत्साहाने अभ्यास करणं कठीण जात आहे. यासाठी आम्ही नीटचे ऑल इंडिया टॉपर डॉ. तन्मय गुप्ताशी बातचीत केली. त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक टीप्स दिल्या. विद्यार्थ्यांनी काही आठवड्यात कशी तयारी करावी याबाबत मार्गदर्शन दिलं.
पेपरफुटीशी संबंधित कंटेन्ट पाहणं बंद करा...
तन्मयने सांगितलं की, नुकत्याच झालेल्या पेपरफुटीची त्याला कल्पना आहे. जेव्हा मी २०२१ च्या परीक्षेची तयारी करत होतो, तेव्हा अशी बातमी समोर आली होती. त्यावेळी आम्ही खूप घाबरलो होतो. तो काळ प्रचंड तणावाचा होता. जे विद्यार्थी खूप मेहनत करतात आणि बराच काळापासून तयारी करत असतात, त्यांच्यासाठी अशी परिस्थिती खूप कठीण असते. विद्यार्थ्यांना सल्ला देताना तन्मय म्हणाला की, हा तणाव आहे. पण एक महिन्यापेक्षा कमी काळ शिल्लक असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासाकडे फोकस करा आणि आपलं बेस्ट द्यायला हवं. हे तुम्ही पेपरफुटीबद्दल जितक्या जास्त बातम्या किंवा व्हिडिओ पाहाल, तितकाच जास्त त्रास तुम्हाला होईल. म्हणून, तयारी सुरू करा आणि आपले सर्वोत्तम देण्याशिवाय दुसऱ्या कशाचाही विचार करू नका.
कशी कराल तयारी...
- गेल्या वर्षीच्या प्रश्नांचा सराव करा
- आधीच अभ्यास केलेल्या टॉपिक्सवर फोकस करा. शेवटच्या टप्प्यात नवीन विषय वाचू नका.
- तुम्हाला जे विषय कठीण वाटतात, त्याची एक यादी तयार करा आणि तयारी करा.
- ज्या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे, ते बाजूला ठेवा आणि कमकुवत विषयांवर काम करा.
- विद्यार्थ्याला प्रत्येक दिवशी किंवा एक दिवसा आड मॉक टेस्ट द्यायला हवी आणि त्यात सुधारणा केली पाहिजे.
कोविडदरम्यान अशी केली तयारी...
तन्मयने शेवटी सांगितलं की, आमची नीटची परीक्षा कोविडदरम्यान झाली होती. त्यावेळी सर्व खूप आव्हानात्मक होतं. आतादेखील विद्यार्थ्यांना अशाच प्रकार चांगली तयारी करावी लागेल. त्यावेळीही प्रचंड उकाडा होता. शिवाय मास्क लावणं आवश्यक होतं. त्यामुळे मी आधीपासून तयारी केली होती. मी घरी परीक्षेच्या हॉलसारख्या परिस्थितीचा सराव करीत होतो. मी खोलीचा एसी बंद करायचो आणि मास्क लावून मॉक टेस्ट देत होतो. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी मला त्या अवस्थेचा फार त्रास झाला नाही. जर तुम्ही घरात आरामदायी खुर्चीत आणि एसी खोलीत बसून तयारी करीत असाल तर परीक्षा केंद्रावरील वातावरणाचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.
टाइम मॅनेजमेंटबाबत टॉपर टिप्स...
नीटमध्ये टॉप करणाऱ्या तन्मयने सांगितलं की, तुम्ही एका दिवसात जितका अभ्यास करू शकता तितकाच करा. स्वत:ला जास्त पूश करू नका. मी दररोज आठ ते दहा तास अभ्यास करू शकत होतो. मी याहून जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्नही करू शकत नव्हतो. मुद्दा हा आहे की, आपले सर्वस्व पणाला लावा. जेव्हा कधी मला थकवा जाणवायचा, तेव्हा मी सराव परीक्षा द्यायला सुरुवात करायचो. याचा मला चांगला फायदा झाला. विद्यार्थी ही रणनीती अवलंबू शकतात.
तन्मयने पुढे सांगितलं की, परीक्षेच्या काळात त्याने जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. त्याने सुरुवातीला जीवशास्त्रासाठी सुमारे ५० मिनिटं, रसायनशास्त्रासाठी ३० ते ३५ मिनिटं आणि भौतिकशास्त्रासाठी सुमारे १ तास २० मिनिटे देण्याचा प्रयत्न केला. त्याने यावर जोर दिला की, तुम्ही आधी जीवशास्त्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे; त्यावर जास्त वेळ वाया घालवण्याची गरज नाही. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासाठी वेळ राखून ठेवा.