5 days ago

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रयागराज महाकुंभला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाडीत चढण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृत ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासह शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच जामनेर येथे आयोजित देवा भाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.   

Feb 16, 2025 21:37 (IST)

Supriya Sule: दिल्ली दुर्घटनेची पारदर्शकपणे चौकशी केली पाहिजे: सुप्रिया सुळे

दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराज येथे महाकुंभला जाण्यासाठी लोकांचा मोठा जमाव वेगवेगळ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी जमला होता. शनिवारी रात्री उशिरा गर्दी वाढल्याने स्थानकात चेंगराचेंगरी झाली. यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, ही दुर्दैवी घटना झाली आहे. या आधीही रेल्वेची दुर्घटना घडली होती. सरकारने या घटनांची पारदर्शकपणे चौकशी केली पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी  संताप व्यक्त केला आहे. 

Feb 16, 2025 21:35 (IST)

Amravati News: अमरावती कृषी विभागाच्या परिसरात असलेल्या प्रशिक्षण हॉलला आग

अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या प्रशिक्षण हॉलला  अचानक शॉर्टसर्किटमध्ये आग लागली. मात्र, मनपाच्या अग्निशमन दलाच्या तातडीने सदर आग आटोक्यात आणली. यामध्ये हॉल मध्ये ठेवलेले साहित्य जळून खाक झाले,कृषी अधीक्षक कार्यालयाचे शंभर क्षमतेचे प्रशिक्षण हॉल( सभागृह) आहे. यामध्ये काही जुने तुटलेले फर्निचर, तसेच निकृष्ट दर्जाच्या काही कॉटन बॅग, यासह कृषी कार्यालयाच्या विविध भागातील जुने कागदपत्रे ( दस्तऐवज) ठेवण्यात आले. रविवारी सायंकाळी या सभागृहाला अचानक आग लागली. कृषी विभागाच्या वतीने सायन्सकोर मैदान येथे कृषी प्रदर्शन सुरू आहे. त्यामुळे कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहे. तसेच रविवार असल्याने केवळ चौकीदारच येथे कामावर होते. सभागृहाला आग लागल्याची माहिती चौकीदार यांनी  अग्निशमक दलाला दिली.

Feb 16, 2025 20:41 (IST)

Nagpur News: स्फोट प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश : पालकमंत्री बावनकुळे

काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स या बारूद कंपनीमध्ये स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. 

या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे निर्देश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनातील सर्व सबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी असून बचाव आणि मदत कार्याबाबत मी प्रशासनाच्या सतत संपर्कात राहून माहिती घेत आहे.

Feb 16, 2025 20:40 (IST)

Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत

दौऱ्या दरम्यान तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी जाणार आहेत

त्यानंतर आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत

आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला  दुपारी तीन वाजल्यापासून सुरुवात होणार आहे

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील उपस्थित राहणार आहेत

Advertisement
Feb 16, 2025 20:05 (IST)

Jalna News: शॉर्टसर्किटमुळे आग, 40 एकर ऊस जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागून अंदाजे 40 एकर ऊस जळून खाक झाला आहे.जालन्यातील हनुमंतखेडा येथे ही घटना घडली आहे.या आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.हनुमंतखेडा येथील गट नंबर 13 आणि 16 मधील संपूर्ण ऊस या आगीमुळे जळून खाक झाला.जवळपास 12 शेतकऱ्यांचा ऊस या आगीत होरपळला आहे.त्यामुळे या शेतकऱ्यानी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Feb 16, 2025 20:04 (IST)

Nashik Accident: आलिशान कारच्या धडकेत शिक्षिका ठार

नाशिकच्या गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक लगत दुपारी तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला या अपघातात एक शिक्षक महिला ठार तर दोन जण जखमी आहेत... याबाबत अधिक माहिती अशी की गायत्री संदीप ठाकूर व मिलन जाचक या दोघे शिक्षिका गंगापूर रोड येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते विवाह सोहळा घराकडे येत असताना जॉगिंग ट्रॅक लगत असलेल्या एका ज्यूसच्या स्टॉलवर जूस पिण्यासाठी थांबले मात्र समोरून भरधाव वेगाने असलेल्या काळ्या रंगाच्या  फोरचुनर वाहनाने चिरडले यामध्ये ठाकूर जखमी झाल्या त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले

Advertisement
Feb 16, 2025 17:16 (IST)

Pune News: क सर्किटने लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग

- शॉक सर्किटने लाकडाचे गोडाऊन ला भीषण आग 

- खेड तालुक्यातील आसखेड खुर्द येथील घटना 

- दुपारच्या सुमारास कडक उन्हाने आगीने रौद्र रूप धारण केले 

- आसपास आसलेली झाडे आगीत जळून खाक 

- घटनास्थळी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू 

- बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंबोरे यांच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू

Feb 16, 2025 15:47 (IST)

Lonand News: लोणखेडी येथे कांदा चाळीला भीषण आग, लाखोंचे नुकसान

धुळे तालुक्यातील लोणखेडी येथे सकाळच्या सुमारास धुळे तालुक्यातील लोणखेडी येथे आज सकाळी मोठे दुर्घटना घडली कांदा उत्पादक शेतकरी जितेंद्र चिंतू पाटील यांच्या शेतातील 126 फूट लांबीच्या कांदा चाळीला अचानक आग लागल्याने अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण कांदा चाळ आगीत खात झाली... या घटनेत शेतकरी जितेंद्र पाटील यांच्या अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे...

Advertisement
Feb 16, 2025 15:24 (IST)

Live Update : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात स्कॉर्पिओ हॉटेलात घुसली; 6 ते 8 जण गंभीर जखमी, एकाचा मृत्यू

लातूरच्या मुरुड बायपास जवळ असलेल्या संत सावता माळी हॉटेलात भरधाव वेगाने येणारी स्कार्पिओ हॉटेलमध्ये घुसल्याने सहा ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात एक बावीस वर्षीय तरुणाचा पोटात कडप्पा घुसल्याने मृत्यू झाला आहे. तेजस पवनकुमार मुंदडा असे मृत तरुणाचे नाव आहे... गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी मुरुड पोलिसांनी धाव घेत जखमींना मुरुड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर काही जणांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

Feb 16, 2025 15:21 (IST)

Live Update : नागपुरात फटाक्यांच्या गोदामात स्फोट, दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्हयातील कळमेश्वर तालुक्यात एका फॅक्टरीत स्फोट होऊन दोन जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती. विभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याबाबत माहिती दिली आहे. फटाक्यांच्या गोदामात स्फोट होऊन आग लागल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

Feb 16, 2025 12:03 (IST)

Live Update : बदलापूरमध्ये भाजपा एकहाती सत्ता जिंकेल!, आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई सोडून राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याबाबत वरून काही निर्णय आला, तर त्याला पूर्ण पाठिंबा असेल. विधानसभेला सगळे विरोधात असतानाही भारतीय जनता पार्टी मजबूत आहे, हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे जे बरोबर येणार असतील, त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू. मात्र कोणी सोबत आले नाहीत, तरीही भारतीय जनता पार्टी बदलापूरमध्ये एक हाती सत्ता जिंकेल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला.

Feb 16, 2025 12:01 (IST)

Live Update : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश

विविध आरक्षण आंदोलनाची दाहकता लक्षात घेता बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 पासून हे आदेश लागू केले गेले असून 1 मार्च पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे करण्यासाठी जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही..असे या आदेशात म्हटले असून बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.

Feb 16, 2025 11:57 (IST)

Live Update : पुणे महापालिका भरवणार आठवडी बाजार, शहरात चार ठिकाणं निश्चित

जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून सेंद्रिय भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून शहरात चार आठवडे बाजार सुरू केले जाणार आहेत. महापालिकेच्या हद्दीतील अॅमेनिटी स्पेस लोहगाव, बाणेर, पाषाण, बावधन व बालेवाडी या ठिकाणची जागा शेतकरी आठवडे बाजारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच, पुढील दोन महिन्यांत हे सर्व बाजार सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.

Feb 16, 2025 11:28 (IST)

Live Update : जीबीएसमध्ये नागपुरात दुसरा मृत्यू, यंत्रणा अलर्टवर

जीबीएसमध्ये नागपुरात दुसरा मृत्यू, यंत्रणा अलर्टवर 

Feb 16, 2025 11:07 (IST)

Live Update : मशीद बंदरजवळील शॉक सर्किटमुळे आग, दोघींचा मृत्यू

मशीद बंदरजवळील शॉक सर्किटमुळे आग, दोघींचा मृत्यू

मशीद बंदरजवळील एका इमारतीच्या तळमजल्यावर शॉक सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. यात दोघींचा मृत्यू झाला असून दोन जखमी महिलांना जेजे रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.  

Feb 16, 2025 09:47 (IST)

Live Update : राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज सेनाभवन येथे राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक

राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज सेनाभवन येथे राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक

कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे अॅक्शन मोडवर

आज सेनाभवन येथे बोलावली राजापूरमधील पदाधिकाऱ्यांची बैठक

आज सायंकाळी 5 वाजता बैठक

Feb 16, 2025 09:46 (IST)

Live Update : संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी खून झाला होता. तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार असून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला होता. तसेच याबाबतची माहिती देखील सादर केली होती. यामध्ये कृष्ण आंधळे यांच्याकडे पाच विविध प्रकारची वाहने असून धारूर व केज येथील बँकेत तीन खाते देखील आहेत. सदरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे..

Feb 16, 2025 08:44 (IST)

Live Update : शिवसेना ठाकरे गटाकडून 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईत भव्य सोहळा

शिवसेना ठाकरे गटाकडून 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईत भव्य सोहळा

ठाकरे गटाच्या स्थानीय लोकाधिकार समितीकडून मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम आयोजित

उद्धव ठाकरे करणार प्रमुख मार्गदर्शन

27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता माटुंगा इथल्या एका सभागृहात होणार आहे

तर मनसे कडूनही 27 फेब्रुवारीला असणारा मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार 

मनसेकडून ही दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानात मराठी भाषा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Feb 16, 2025 08:43 (IST)

Live Update : वादग्रस्त महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत मोठी बातमी, शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळच्या लढतीची होणार फेरतपासणी

वादग्रस्त महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत मोठी बातमी 

- शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळच्या लढतीची होणार फेरतपासणी

- चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती करण्यात आली गठीत 

- शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच विलास लथुरे असणार समितीचे प्रमुख 

- पंचाच्या निर्णयाची चौकशी करण्यात येऊन 28 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाकडे समितीकडून अहवाल सादर केला जाणार