यमुना नदीत फेसाचा जाड स्तर, पाणी झालंय विषारी; CPCB ने सांगितलं कारण

यमुना नदीच्या पाण्यावर फेसाचा मोठा जाड स्तर पाहायला मिळत आहे. याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

हिवाळ्याची सुरुवात होताच हवेच्या प्रदूषणात वाढ होते. यासोबतच यमुना आणि हिंडनच्या पाण्यातील प्रदूषणाचा स्तर वाढत आहे. यमुना नदीच्या पाण्यावर फेसाचा मोठा जाड स्तर पाहायला मिळत आहे. याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत. उत्तर भारतात मोठ्या संख्येने साजरा केला जाणाऱ्या छठ सणात नदीत दिवे सोडण्याची प्रथा असते. छठ सण जवळ आला आहे. आणि दुसरीकडे यमुनेतील पाणी दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत आहे. Central Pollution Control Board ने याबाबत भीती व्यक्त केली आहे. 

ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदीतील ऑक्सीजन स्टर आधीपेक्षा अधिक चांगला झाला होता. मात्र पाऊस जाताच पुन्हा यमुनेतील पाण्यात बीओडी, पीएच आणि टीडीएसचं (टोटल डिजॉल्व्ड सॉलिड्स) प्रमाण वाढत आहे. 

नक्की वाचा - Supreme Court : बांग्लादेशातून आसाममधील स्थलांतरितांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

त्यामुळे यमुनेत पाण्याचा फेस दिसू लागला आहे. यूपीपीसीबीनुसार, यमुनामध्ये ओखला बैराजजवळ 26 सप्टेंबरला एका नमुन्यात पाण्याचं पीएच 7.51 आहे. तर पाण्याचा टीडीएस 311.0 इतकं आहे. मानकानुसार, शुद्ध पाण्यात पीएचचा स्तर 7 असणं अपेक्षित आहे. तर टीडीएसचं प्रमाण 300 हून कमी असायला हवं. शुद्ध पाण्यात बीओडीचं प्रमाण 5 मिलिग्रॅम प्रति लीटरपेक्षा कमी असायला हवं. मात्र यमुनेतील पाण्याचा बीओडीचा स्तर मानंकांनुसार अनेक पटीने जास्त आहे. 

दिल्ली प्रदूषण नियंत्रण बोर्डाने 4 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये यमुना नदीतील पाण्याची चाचपणी करण्यात आली आहे. यामध्ये यमुना नदीतील कोलीफॉर्मचा स्तर खूप जास्त आहे. यमुनामध्ये फेकल कॉलीफार्मचा स्तर 49,00,000 एमपीएन प्रति 100 एमएलपर्यंत पोहोचला आहे. हा लेवल मानक स्तर 2500 युनिटपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. 

विविध पर्यावरणतज्ज्ञांनुसार, दिल्ली परिसरातील कंपन्यांमधून निघणाऱ्या विषारी द्रव्यामुळे यमुना दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत चालली आहे. याशिवाय सांडपाणी व्यवस्था आणि कचऱ्याची विल्हेवाट कशी व्यवस्थित ठेवायची याबद्दल नागरिकांना प्रशिक्षित करणं आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे.   

पाण्यात जैव रासायनिक ऑक्सिजनची मागणी वाढली...
दिल्ली प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अहवालानुसार, यमुनेत बीओडीचा स्तर अधिकांश भागातील मानकांना अनुरुप नाही. अहवालानुसार, यमुनेत बीओडीचा स्तर केवळ पल्ला क्षेत्रातच मानकांनुसार अनुरूप आहे. यानंतर यमुनेत प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वात अधिक असगरपुरात 29 मिलिग्रॅम प्रति लिटर असल्याचं स्पष्ट झालं आहे. ओखला बैराजमध्ये 27, ओखला ब्रिजमध्ये ऑक्टोबरमध्ये 25, आयटीओ ब्रिजमध्ये 23, निजामुद्दीन ब्रिजमध्ये 21, आयएसबीटी ब्रिजमध्ये ११, वरीदाबादमध्ये बीओडीचा स्तर जवळपास 5 मिलिग्रॅम प्रति लिटर आहे.