दारूच्या दुकानात गाण्याचे कार्यक्रम होणार, ऑर्केस्ट्रालाही मिळणार परवानगी

ही सुविधा फक्त विदेशी दारू विकणाऱ्या दुकानांसाठीच उपलब्ध असेल, देशी दारूची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसेल

Advertisement
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

ओडिशा सरकारने नवे अबकारी धोरण आणले असून यामध्ये दारू विक्रीच्या दुकानांमध्ये गाण्याचे कार्यक्रम आणि ऑर्केस्ट्राला परवानगी देण्यात आली आहे. गाण्याच्या कार्यक्रमांना परवानगी दिली असली तरी नृत्याला परवानगी देण्यात आलेली नाही. 1सप्टेंबरपासून नवे अबकारी धोरण लागू केले जाणार आहे. या धोरणात म्हटले आहे की सप्टेंबर महिन्यापासून ओडिशातील दारू विक्रीच्या दुकानात गाण्याचे कार्यक्रम आयोजित करता येतील किंवा ऑर्केस्ट्राही आयोजित करता येईल मात्र या दुकानांमध्ये नाचण्याचे कार्यक्रम घेता येणार नाहीत. यासाठी दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांना 2017 च्या नव्या अबकारी धोरणाअंतर्गत परवानगी घ्यावी लागेल. 

ही सुविधा फक्त विदेशी दारू विकणाऱ्या दुकानांसाठीच उपलब्ध असेल, देशी दारूची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसेल असे ओडिशा सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ओडिशाच्या ग्रामीण भागात यंदाच्या वर्षी एकाही विदेशी दारू विक्रीच्या दुकानाला परवानगी देण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र थ्री स्टार हॉटेल आणि बिअर पार्लरसाठी ही अट शिथील करण्यात आली आहे. 
 

Topics mentioned in this article