Lt Gen Upendra Dwivedi: 40 वर्षांचा अनुभव, काश्मीमध्येही होते तैनात; नवे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींबाबत जाणून घ्या माहिती

देशाचे नवे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी (New Army Chief Upendra Dwivedi) देशाच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर काम करण्याचा उत्तम अनुभव आहे. केवळ दहशतवादाविरोधातच नव्हे तर ईशान्येकडील राज्यांमधील बंडखोरीविरोधातही त्यांनी मोठमोठ्या कारवाया केल्या आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins

देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी (Lt General Upendra Dwivedi New Army Chief) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून ते 30 जून रोजी पदभार स्वीकारतील. याबाबतची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी (11 जून) रात्री केली आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी (Lt General Upendra Dwivedi New Army Chief) यांना चीन आणि पाकिस्तानजवळील देशाच्या सीमेवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे. काश्मीरमध्येही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जनरल उपेंद्र द्विवेदी सध्या लष्कराचे उप-प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर जनरल मनोज पांडे 30 जून रोजी निवृत्त होतील, त्यावेळेस उपेंद्र द्विवेदी (Lt General Upendra Dwivedi New Army Chief) नवीन लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांची नियुक्ती करताना केंद्र सरकारने सेवाज्येष्ठता तत्त्वाचे पालन केले. 

(नक्की वाचा: लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी नवे लष्करप्रमुख, 30 जूनला स्वीकारणार पदभार)

30 जून रोजी स्वीकारणार पदभार 

सरकारने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. दरम्यान केंद्र सरकारने गेल्या महिन्यामध्ये विद्यमान जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ त्यांच्या निवृत्तीच्या काही दिवस आधी एक महिन्याने वाढवला. यापूर्वी ते 31 मे रोजी निवृत्त होणार होते. जनरल पांडे यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या निर्णयामुळे लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांना सर्वोच्च पदासाठी दुर्लक्षित केले जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.  

Advertisement

(नक्की वाचा: ... म्हणून लोकसभा निवडणुकीत BJP ला फटका, RSS च्या मुखपत्रानं टोचले भाजपाचे कान)

नवे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याबाबत जाणून घ्या माहिती  

  • लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी सध्या उपसेनाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.  
  • 19 फेब्रुवारी रोजी त्यांनी लष्कराच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. 
  • लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी 2022-2024 पर्यंत उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. 
  • पूर्व लडाखसंदर्भात चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
  • लष्कराच्या उत्तर कमांडचे काम चीनला लागून असलेल्या सीमेचे आणि पाकिस्तानजवळील भारताच्या सीमेचे रक्षण करणे हे आहे.
  • लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा जन्म 1 जुलै 1964 रोजी झाला आहे. त्यांनी रेवा येथील सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे.
  • 15 डिसेंबर 1984 रोजी ते भारतीय लष्कराच्या 18-जम्मू काश्मीर रायफल्समध्ये भरती झाले होते. 
  • यानंतर त्यांनी युनिटची कमान सांभाळली. सुमारे 40 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

नवीन लष्करप्रमुखांकडे दहशतवादाविरोधात लढा देण्याचे आहे कौशल्य 

देशाच्या नव्या लष्करप्रमुखांकडे देशाच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी काश्मीर आणि राजस्थानमधील युनिटचेही नेतृत्व केले आहे. केवळ दहशतवादाविरोधातच नव्हे तर ईशान्येकडील राज्यांमध्ये बंडखोरीविरोधातही त्यांनी मोठ्या कारवाया केल्या आहेत. 

Advertisement
Advertisement

(नक्की वाचा: चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा घेणार आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, कसं असेल त्यांचं मंत्रिमंडळ?)

Upendra Dwivedi Named New Army Chief । उपेंद्र द्विवेदी यांची देशाच्या लष्करप्रमुखपदी निवड