सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपला नवीन प्रीपेड प्लान बाजारात आणला आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनीचा हा नवीन प्लान 345 रुपयांचा आहे. बीएसएनएलचा हा प्लॅन 60 दिवसांसाठी वैध असेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेटचा वापर करण्यासाठी दररोज 1 GB डेटा मिळणार आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40Kbps होईल. यासोबतच या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मोफत असतील आणि ग्राहक देशभरात कुठेही अमर्याद कॉल करू शकाल.
नक्की वाचा : फ्लिपकार्टवर iPhone15 ची किंमत पाहून तुम्हाला धक्काच बसेल
BSNL च्या 347 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळेल 2 जीबी डेटा
बीएसएनएलचा हा प्लॅन 54 दिवसांसाठी वैध असेल. या प्लॅनमध्ये इंटरनेटसाठी दररोज 2 जीबी डेटा मिळेल. डेटाची मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा स्पीड 40Kbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील. बीएसएनएलच्या या प्लॅनमुळे ग्राहकांना झिंग म्युझिक आणि बीएसएनएल ट्यून्सची सुविधा मोफत मिळेल.
नक्की वाचा : आता मुलांच्या पेन्शनचीही झाली सोय, काय आहे केंद्र सरकारची नवी योजना?
150 दिवसांसाठी वैध असलेला 397 रुपयांचा प्लॅन
अल्प दरात अधिक दिवसांची वैधता देणारा हा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 2 जीबी डेटा मिळेल आणि त्यानंतर इंटरनेट स्पीड हा 40Kbps कमी केला जाईल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्याद कॉलची सुविधा मिळेल आणि सोबतच दररोज 100 मोफत एसएमएसचीही सुविधा मिळेल. हा प्लॅन 150 दिवसांसाठी वैध असेल. असं असलं तरी या प्लॅनमधील मोफत फायदे फक्त 30 दिवसांसाठीच उपलब्ध असतील. 30 दिवसांनंतर, तुम्हाला लोकल कॉलसाठी 1 रुपये प्रति मिनिट आणि एसटीडी कॉलसाठी 1.3 रुपये खर्च करावे लागतील.
नक्की वाचा : अलंकृताला गुगलने दिलं 60 लाखांचं पॅकेज
485 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल
BSNL ने आपल्या 485 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केला आहे. हा प्लॅन पूर्वी 82 दिवसांसाठी वैध असायचा तो आता 80 दिवसांसाठी वैध असेल. मात्र या प्लॅनमध्ये रोजच्या वापरासाठीची डेटा मर्यादा वाढवण्यात आली आहे. पूर्वी या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला 1.5 GB डेटा मिळत होता जो आता 2 GB करण्यात आला आहे.