गुगलकडून (Google Jobs) अनेक भारतीयांना आतापर्यंत चांगल्या पगाराची नोकरी ऑफर करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी गुगलने बिहारच्या भागलपूर जिल्ह्याची अलंकृता साक्षी हिला 60 लाखांचं वार्षिक पॅकेजची नोकरी दिली आहे. अलंकृताने यापूर्वी अर्न्स्ट एंड यंग, विप्रो और सॅमसंग सारख्या कंपनींसोबत काम केलं आहे. साक्षीने आपल्या नव्या नोकरीसंदर्भातील अपडेट लिंक्डइनवर शेअर केली आहे. तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.
कोणती पोस्ट?
अलंकृताने दिलेल्या माहितीनुसार, तिला इथे सिक्युरिटी एनलिस्टची पोस्ट ऑफर करण्यात आली आहे. या पोस्टसाठी कंपनीने तिला साठ लाखांचं पॅकेज दिलं आहे. म्हणजे तिचा महिन्याचा पगार हा पाच लाखांच्या घरात असेल.
अलंकृताने झारखंडमधील युनिवर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं. तिने आपल्या करिअरची सुरुवात विप्रोमध्ये प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून केली होती. यानंतर अर्न्स्ट अँड यंगमध्ये सिक्युरिटी एनलिस्ट म्हणून रुजू झाली होती. आता दोन महिन्यांनंतर ती गुगलमध्ये सिक्युरिटी एनलिस्ट म्हणून रुजू होईल.
नक्की वाचा - iPhone 16 सीरिजची प्री-बुकिंग आजपासून सुरू, कंपनीकडून जबरदस्त discount offer
गुगलवर नोकरी कशी मिळवाल?
- गुगलसारख्या मोठ्या कंपनीत एकदा तरी नोकरीची संधी मिळावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र गुगलमध्ये नोकरी मिळविण्यासाठी अत्यंत खडतर टप्पे पार करावे लागतात. येथे इंटर्नशीपसाठीही लाखो रुपये मोजले जातात.
- गुगलचं कल्चर, मिशन, प्रॉडक्सचा अभ्यास करा. यानंतर तुम्ही गुगलमध्ये कोणत्या प्रकारची नोकरी करू शकता याचा विचार करा.
- Google च्या करिअर वेबसाइट https://careers.google.com/ ला भेट द्या. येथे तुमचं अकाऊंट तयार करा. आणि तुमच्याबद्दलची माहिती देऊन आवश्यक ऑनलाइन अर्ज करा.
- तुम्ही टेक कॉन्फरन्स, मीटअप आणि इंडस्ट्री इव्हेंट्समध्ये सहभागी व्हावे. Linkedin वर वर्तमान किंवा माजी Google कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा आणि माहितीपूर्ण मुलाखतींसाठी विचारा.
- गुगलची मुलाखत अत्यंत कठीण मानली जाते. गुगलच्या मुलाखतीत तुम्ही प्रश्न सोडवता, अडचणी कशा हाताळता याकडेही लक्ष दिलं जातं. याशिवाय कोडिंगचाही सराव करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world