Uttar Pradesh News: लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असतानाच, पाटणा येथील नागरिकांसमोर इंधनाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. घरगुती ग्राहकांच्या सोयीसाठी सरकारने लग्नसमारंभात व्यावसायिक (Commercial) सिलिंडरचा वापर अनिवार्य केला आहे. मात्र, या सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने आता चक्क 'मुलाखत' (Interview) आणि कागदपत्रांच्या कडक पडताळणीची प्रक्रिया सुरू केली आहे.
'इंटरव्यू' आणि पडताळणी का?
व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यात 70 टक्के कपात करण्यात आली आहे. मर्यादित साठा आणि वाढती मागणी यामुळे खालील बाबींची तपासणी केली जात आहे. पत्रिका खरी आहे की बनावट, याची शहानिशा एसडीओ (SDO) करणार आहेत. किती पाहुणे येणार आहेत आणि त्यानुसार किती सिलिंडर लागतील, याचे आकलन केले जाईल. अर्जदाराला संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन अर्जातील तथ्यांची खात्री करून द्यावी लागेल.
(नक्की वाचा- Nagpur School Holiday: नागपुरात शनिवारी सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर; कुणा-कुणाला सुट्टी लागू?)
'एस्मा' अंतर्गत कारवाईचा इशारा
लग्नाच्या नावाखाली व्यावसायिक सिलिंडर घेऊन त्यांची काळाबाजार करणाऱ्यांवर एशेंशियल सर्विसेस मेंटेनन्स ॲक्ट (ESMA) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. ज्यांच्या घरात खरोखर लग्न आहे, त्यांनाच प्राधान्याने गॅस मिळावा, हा यामागचा उद्देश आहे.
(नक्की वाचा- Heatwave Side Effect: उन्हाळ्याचा नवा 'साईड इफेक्ट'! उष्माघातच नाही, तर आता या गंभीर आजारांचा धोका)
नवीन नियम आणि अटी
लग्नासाठी सिलिंडर हवे असल्यास सर्वसामान्य नागरिक आणि केटरर्सना आता लग्नाच्या पत्रिकेसोबतच ओळखपत्र (ID), गॅस कनेक्शन बुकची प्रत आणि पाहुण्यांची यादी, 19 किलोच्या एका सिलिंडरची किंमत 2353.50 रुपये असून, प्रति सिलिंडर 2400 रुपये सुरक्षा ठेव जमा करावी लागेल. सर्व केटरर्सना जीएसटी (GST), फूड लायसन्स किंवा एसडीओ कार्यालयाकडून नोंदणी क्रमांक मिळवणे अनिवार्य आहे.