NHAI QR Code: महामार्गावर QR कोड; प्रवाशाने स्कॅन केल्यावर मिळाली भन्नाट माहिती; तुम्हालाही अभिमान वाटेल

NHAI च्या मते, प्रवासादरम्यान माहितीसाठी लोक अनेकदा इंटरनेटवर अवलंबून असतात. तिथे अनेकदा चुकीची माहिती किंवा सायबर फ्रॉडचा धोका असतो. अधिकृत QR कोडमुळे प्रवाशांना थेट सरकारी पोर्टलवरून खात्रीशीर माहिती मिळेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

QR Code Boards on Highways: देशातील राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) एक मोठी तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हायवेवर आता ठराविक अंतरावर QR कोड असलेले माहिती फलक दिसणार आहेत. या सुविधेमुळे प्रवाशांना रस्ते सुरक्षा, पारदर्शकता आणि प्रवासातील सुलभता मिळणार असल्याचा दावा NHAI ने केला आहे.

बेंगळुरूमध्ये झाली सुरुवात

या नाविन्यपूर्ण उपक्रमाची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून करण्यात आली आहे. NH-48 आणि NH-75 या दोन प्रमुख महामार्गांवर हे बोर्ड लावण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात देशभरातील सर्व महत्त्वाच्या हायवे कॉरिडॉरवर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

QR कोड स्कॅन केल्यावर काय माहिती मिळेल?

हे माहिती फलक महामार्गावर प्रत्येक 2 ते 3 किलोमीटर अंतरावर लावले जात आहेत. प्रवाशांनी आपल्या मोबाईलवरून हा कोड स्कॅन केल्यास खालील अधिकृत माहिती त्वरित उपलब्ध होईल.

  • नजीकच्या सुविधा: पेट्रोल पंप, रुग्णालये, हॉटेल, ढाबे आणि रेस्ट एरिया.
  • सुरक्षा यंत्रणा: पोलीस मदत केंद्र, हायवे पेट्रोल टीम, जवळचे पोलीस स्टेशन आणि रुग्णवाहिका सेवा.
  • तांत्रिक माहिती: टोल प्लाझा, ट्रक पार्किंग आणि नॅशनल हायवे हेल्पलाइन नंबर.

(नक्की वाचा-  Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)

NHAI कडून तंत्रज्ञानावर भर का?

NHAI च्या मते, प्रवासादरम्यान माहितीसाठी लोक अनेकदा इंटरनेटवर अवलंबून असतात. तिथे अनेकदा चुकीची माहिती किंवा सायबर फ्रॉडचा धोका असतो. अधिकृत QR कोडमुळे प्रवाशांना थेट सरकारी पोर्टलवरून खात्रीशीर माहिती मिळेल. ज्यामुळे विशेषतः आणीबाणीच्या काळात मोठी मदत होऊ शकते.

Advertisement

सोशल मीडियावर उपक्रमावर का उठलेत सवाल?

NHAI चा हा उपक्रम सकारात्मक असला तरी, 'X' (ट्विटर) सारख्या प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांनी यावर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आधी सांगितले होते की, या कोडद्वारे कंत्राटदाराचे नाव, प्रकल्पाची किंमत आणि देखभालीचा तपशील मिळेल. मात्र, युजर्सचे म्हणणे आहे की प्रत्यक्षात स्कॅन केल्यावर ही माहिती दिसत नाही. हायवेवर गाडी थांबवून QR कोड स्कॅन करणे धोक्याचे ठरू शकते. यामुळे ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे. धुळ, पाऊस किंवा पोस्टरमुळे हे कोड खराब झाले तर ते काम करणार नाहीत, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

भारतीय रस्ते जाळ्याचा विस्तार वेगाने होत असताना अशा तांत्रिक सुधारणा महत्त्वाच्या आहेत. मात्र, जर यामध्ये कंत्राटदारांची जबाबदारी आणि प्रकल्पाची पारदर्शक माहिती जोडली गेली, तरच हा उपक्रम खऱ्या अर्थाने 'गेम चेंजर' ठरेल.

Advertisement