जाहिरात

'युद्धात किंवा कोव्हिडमध्येही इतके मरत नाहीत, मला चेहरा लपवावा लागतो...' संसदेत गडकरींची कबुली

Nitin Gadkari : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लोकसभेतील एका प्रश्नाचं उत्तर देताना  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका गंभीर विषयावर कबुली दिली आहे.

'युद्धात किंवा कोव्हिडमध्येही इतके मरत नाहीत, मला चेहरा लपवावा लागतो...' संसदेत गडकरींची कबुली
मुंबई:

Nitin Gadkari on Road Accident : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लोकसभेतील एका प्रश्नाचं उत्तर देताना  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका गंभीर विषयावर कबुली दिली आहे. गडकरींनी देशातील रस्ते अपघातांवर काळजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की, 'मी पहिल्यांदा रस्ते वाहतूक मंत्री झालो होतो त्यावेळी या अपघातांची संख्या 50 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण ही संख्या आता वाढली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'मला चेहरा लपवावा लागतो'

गडकरींनी पुढं सांगितलं की, 'मी रस्ते अपघातांबाबत चर्चा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये जातो. त्यावेळी माझ्यावर चेहरा लपवण्याची वेळ येते. आपला (अपघातांमध्ये) सर्वात खराब रेकॉर्ड आहे. देशात दरवर्षी रस्ते अपघातामध्ये 1.78 लाख जणांचा मृत्यू होतो. त्यामध्ये 60 टक्के पीडित हे 18 ते 34 वयोगटातील आहेत.

युद्ध, कोव्हिड आणि दंगलीमध्येही नाही...

देशातील रस्ते अपघातांची संख्या सातत्यानं वाढत आहे. इतके लोकं युद्ध, कोव्हिड किंवा दंगलीतही मरत नाहीत, असं गंभीर वक्तव्य त्यांनी केलं. हे अपघात कमी करण्यासाठी खासदारांनी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करावेत, असं आवाहन गडकरींनी केलं. या विषयांवर परिवहन विभागाच्या सहकार्यानं शाळांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत.

Worship Act: मंदिर-मशीद वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला दिले आदेश

( नक्की वाचा :  Worship Act: मंदिर-मशीद वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला दिले आदेश )

रस्ते अपघातामधील 30 टक्के मृत्यू हे जीव वाचवण्याचे उपचार न मिळाल्यानं होतात, असं त्यांनी नीती आयोगाच्या रिपोर्टचा दाखला देत स्पष्ट केलं. या प्रश्नावर मात करण्यासाठीच कॅशलेस योजना सुरु करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पायलट पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे. त्यानंतर ही संपूर्ण देशात याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती गडकरींनी दिली. 

ड्रायव्हिंग लायसन मिळण्याच्या पद्धतीमध्येही सुधारणा होणे आवश्यक आहे. जगात जिथं सर्वात सहज लायसन मिळणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचं ते यावेळी म्हणाले. रस्ते अपघातामध्ये सर्वात जास्त 23,000 मृत्यू उत्तर प्रदेशात झाले आहेत. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 18,000 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात ही संख्या 15,000 पेक्षा जास्त आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक असून तिथं 13,000 पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची आकडेवारी गडकरींनी सादर केली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com