आपल्या स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोपऱ्यात झुरळ दिसले की आपल्याला किळस वाटते. अशी असंख्य घरे आहेत ज्या घरांमध्ये झुरळांचा खूप त्रास आहे. झुरळं घरातून पळवून लावण्यासाठी किंवा त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध औषधे वापरली जातात, पेस्ट कंट्रोल केले जाते. मात्र तरीही झुरळांची समस्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही. काही वैज्ञानिकांनी ही झुरळं पृथ्वीवरून कायमची नष्ट करण्यात आली तर काय होईल, या प्रश्नाचे उत्तर शोधून काढण्यासाठी संशोधन केले. या संशोधनातून निघालेले निष्कर्ष मानवासाठी चिंता निर्माण करणारे आहेत. पृथ्वीवरून झुरळं नष्ट झाली तर निसर्ग चक्राला मोठा धक्का बसेल असं वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
नक्की वाचा: फक्त 10 रुपये खर्च आणि झुरळं होतील गायब, हा छोटासा पांढरा तुकडा करेल कमाल
झुरळांच्या 5,000 हून अधिक प्रजाती
जगात झुरळांच्या 5,000 हून अधिक प्रजाती आहेत आणि त्यापैकी बहुतांश प्रजाती जंगलात किंवा घनदाट झाडी असलेल्या किंवा मानवाची वस्ती कमी असलेल्या ठिकाणी सापडतात. झुरळांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे स्वच्छता राखण्याचे आहे. नैसर्गिक चक्रामध्ये झुरळे ही इतर प्राण्यांसाठी पोषणाचा मुख्य स्त्रोत असतात. झुरळं सडलेले लाकूड, पाने आणि मृत प्राण्यांसह नैसर्गिकरित्या विघटन होणारे पदार्थांवर जगतात. झुरळांची विष्ठा मातीत मिसळल्यानंतर नायट्रोजनसारखे आवश्यक पोषक घटक मातीला मिसळतात. झाडी,झुडपांच्या वाढीसाठी नायट्रोजन हे महत्त्वाचं पोषण तत्व आहे.
नक्की वाचा: झोपेत नाकात शिरले झुरळ आणि श्वसननलिकेत अडकले, यानंतर जे घडले त्यावर विश्वास बसणार नाही
निसर्ग चक्रात झुरळांची महत्त्वाची भूमिका
जर झुरळे नाहीशी झाली, तर मृत प्राणी, झाडे यांचे विघटन मंदावेल ज्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढेल सोबतच मातीला पोषक तत्वे मिळण्याचे प्रमाणही घटेल. यामुळे झाडांची वाढ खुंटेल, जंगलातील निसर्ग चक्र विस्कळीत होईल. मातीला नैसर्गिक पोषण तत्वे न मिळाल्याने कृत्रिम खते, रसायने यांचा वापर करावा लागेल ज्यामुळे मातीचा पोत खराब होईल. झुरळं ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जगू शकतात. जर झुरळं नष्ट झाली तर निसर्ग चक्रात एक मोठी पोकळी निर्माण होईल.