
दिवाळी जवळ आली आहे. अनेक घरांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने साफसफाई केली जाते. गेल्या काही वर्षांत अनेक घरांमध्ये झुरळांची समस्या वाढली असून दिवाळीत घरी पाहुण्यांना बोलवायचे म्हणजे टेन्शन असते. कारण पाहुण्यांना ही झुरळं दिसली तर आपली लाज जाईल अशी भीती वाटत असते. महागडे उपाय करून, स्प्रे मारूनही ही झुरळं मरत नाही किंवा पूर्णपणे नष्टही होत नाही. युट्युबर माधुरी शिंदे यांनी झुरळांच्या उपायावर एक उपाय सांगितला आहे. घरातच उपलब्ध असलेल्या गोष्टींच्या मदतीने बाजारात अगदी स्वस्तात उपलब्ध असलेल्या एका छोट्या पांढऱ्या तुकड्याच्या मदतीने आपण झुरळांचा नायनाट करू शकतो. हा उपाय वापरल्यास झुरळं नाहीशी होतातच शिवाय आपल्या आरोग्याला कोणताही अपाय होत नाही. तुम्हीही झुरळांनी हैराण झाला असाल तर हा उपाय करून बघायला हरकत नाही.
नक्की वाचा: Green Pickle Recipe: 15 मिनिटांत घरच्या घरी झटपट तयार करा मिरचीचे लोणचे
घरच्या घरी झुरळांना मारण्यासाठीचे औषध कसे बनवायचे ?
हे औषध बनविण्यासाठी तुम्हाला पाणी, काही नैसर्गिक आणि छान सुगंध असलेल्या गोष्टींची गरज आहे. सगळ्यात पहिले म्हणजे एक ग्लासभर पाणी घ्या, त्यात लिंबू अर्ध कापून टाका. सोबतच तमालपत्राची 3-4 पाने तोडून पाण्यात टाका. लिंबातील आम्ल आणि तमालपत्राचा उग्र वास झुरळांना पळवून लावण्यासाठी मदत करतो. लिंबू, तमालपत्र घातलेलं पाणी चांगलं उकळून घ्या. पाणी उकळत असताना आपल्याला कुठेही सहजपणे मिळणाऱ्या तुरटीचा एक खडा या पाण्यात टाका. तुरटीचा एक प्रकारचा गंध असतो जो झुरळांना येत असतो आणि त्यांना तो अजिबात आवडत नाही. मिश्रणाचं हे पाणी नीट गाळून घ्या.
नक्की वाचा: धकाधकीच्या जीवनामध्ये शांत आणि गाढ झोप कशी मिळावी? 7 सोप्या टिप्स वाचा
झुरळांना पळवण्यासाठीचे औषध कसे वापरावे?
पाणी गाळून घेतल्यानंतर ते कोमट असतानाच त्यात बेकींग सोडा घालावा. कोमट पाण्यात बेकींग सोडा घातल्यानंतर पाण्याला फेस येईल. हे मिश्रण झुरळांसाठी कर्दनकाळ ठरेल. बेकींग सोड्याचा फेस खाली बसला की या मिश्रणात मीठ आणि कापूर पावडर घाला आणि सगळ्यात शेवटी या मिश्रणात एक बूच भरून डेटॉल घाला. लक्षात ठेवा की हे मिश्रण कोमट असतानाच त्याचा वापर करणं गरजेचं आहे. हे मिश्रण जिथे जिथे झुरळं आहेत तिथे स्प्रे करा. 2-3 आठवडे हा उपाय केल्याने झुरळांचा नायनाट होण्यास मदत होईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world