No Detention Policy cancelled : केंद्राचा मोठा निर्णय, आता 5वी आणि 8वीत नापास विद्यार्थ्यांना प्रमोट करता येणार नाही!

No Detention Policy : शिक्षण मंत्रालयाने प्राथमिक स्तरावर अभ्यासाच्या पातळीत सुधारणा करीत मोठं पाऊल उचललं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे पाचवी आणि आठवीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं जाणार नाही. आतापर्यंत पाचवी आणि आठवीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करीत पुढच्या वर्गात प्रमोट केलं जात होतं. मात्र आता या निर्णयात मोठा बदल करण्यात आला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्याच्या आत पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. मात्र यानंतरही विद्यार्थी नापास झाला तर त्याला प्रमोट केलं जाणार नाही. 

Advertisement

नक्की वाचा - GST Council Meet : विमा धारकांच्या पदरी पुन्हा निराशा, जीएसटी परिषदेत कोणताही निर्णय नाही

शिक्षण मंत्रालयाने प्राथमिक स्तरावर अभ्यासाच्या पातळीत सुधारणा करीत मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पाचवी आणि आठवीसाठी नो डिटेंशन पॉलिसी बंद केली आहे. याअंतर्गत शाळांना वार्षिक परीक्षेत यश न मिळालेल्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याची परवानगी दिली होती.  मात्र नव्या बदलात नो डिटेंशन पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

16 राज्यांमध्ये नो डिटेंशन पॉलिसी आधीच रद्द..
2019 मध्ये राईट टू एज्युकेशनअंतर्गत तब्बल 16 राज्य आणि दोन केद्रशासित प्रदेशांमध्ये पाचवी आणि आठवीत नो डिटेंशन पॉलिसी रद्द करण्यात आली होती. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून आता पॉलिसी रद्द केल्यानंतर कोणी पाचवी आणि आठवीमध्ये नापास झाला तर त्याला दोन महिन्याच्या आत परीक्षा पास करावी लागेल. जर तो परीक्षेत पास झाला नाही तर त्याला पुढील वर्गात प्रमोट केलं जाणार नाही. या नव्या बदलाचा उद्देश विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता वाढविणे आणि शैक्षणिक कामगिरीत सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

Advertisement