तील पुरी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रह्मगिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बलिहारीचंडी समुद्रकिनाऱ्यावर एका विद्यार्थिनीवर तिच्या बॉयफ्रेंडसमोरच दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना शनिवारी घडली होती, परंतु बदनामीच्या भीतीने पीडितेने तक्रार करण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी समजूत घातल्यानंतर सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एकाची चौकशी सुरू आहे.
धमकावून केला सामूहिक बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी शनिवारी दुपारी आपल्या बॉयफ्रेंडसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेली होती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या आरोपींनी या जोडप्याचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. आरोपींनी पीडितेच्या बॉयफ्रेंडला मारहाण केली आणि त्यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
(नक्की वाचा- Dombivli: एका शिक्षिकेला फसविले; दुसरीसोबत लग्न, तिसरीपासून मुल, डोंबिवलीतील शिक्षकाचे धक्कादायक कृत्य)
घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, मात्र पोलिसांनी पीडितेचा शोध घेऊन तिला तक्रार देण्यासाठी समजूत काढली. बदनामीच्या भीतीने सुरुवातीला ती तक्रार देण्यास घाबरत होती, पण पोलिसांनी धीर दिल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला आणि आरोपींचे वर्णन देखील सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.
आरोपींना अटक, मोबाईलची तपासणी सुरू
पुरीचे पोलीस अधीक्षक प्रतीक सिंग यांनी सांगितले की, सोमवारी ब्रह्मगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 70 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Ayush Komkar Case: भयंकर सूडचक्र! एक मर्डर अन् अख्खं कुटुंब तुरुंगात, पुण्याच्या गँगवॉरची हादरवणारी STORY)
आरोपींकडून त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पोलिसांच्या भीतीने व्हिडीओ डिलीट केले होते. तरीही, पुढील तपासासाठी आणि डेटा रिकव्हरीसाठी हे मोबाईल भुवनेश्वरमधील राज्य फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.