स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ओला इलेक्ट्रीकने (Ola Electric) नवी ई-बाईक (E-Bike) बाजारात आणली आहे. रोडस्टर असं या बाईकचं नाव असून ही बाईक तीन मॉडेलमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. रोडस्टर प्रो, रोडस्टर आणि रोडस्टर X अशी या बाईकच्या मॉडेल्सची नावे आहेत. भारताला जागतिक पातळीवर इलेक्ट्रीकवर धावणाऱ्या वाहनांचे केंद्र बनविण्याचा आपला उद्देश असल्याचे ओला इलेक्ट्रीकतर्फे सांगण्यात आले आहे. या बाईकच्या घोषणेसोबतच ओलाने स्वत: विकसित केलेल्या बॅटरींबाबतही घोषणा केली आहे. ओलाच्या सगळ्या बाईकमध्ये ओलाने विकसित केलेल्याच बॅटरी असतील आमि याची सुरुवात पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यापासून होईल असे सांगण्यात आले आहे.
बाईकची किंमत किती?
रोडस्टर प्रो बाईक दोन प्रकारात उपलब्ध असेल. या मॉडेल्सची किंमत 1,99,999 आणि Rs 2,49,999 रुपये असणार आहे. रोडस्टर प्रो बाबत बोलायचे झाल्यास ही बाईक 105 NM टॉर्कचा टप्पा गाठू शकते
रोडस्टर बाईक तीन प्रकारात उपलब्ध असेल, या बाईकची तीन प्रकारांची किंमत 1,04,999, Rs 1,19,999 आणि 1,39,999 रुपये अशी असणार आहे. 3.5 kWh, 4.5 kWh, 6 kWh बॅटरी क्षमता असलेले रोडस्टरचे तीन प्रकार असणार आहेत.
रोडस्टर X ही देखील तीन प्रकारात उपलब्ध असून या प्रकारातील बाईक अनुक्रमे 74,999, Rs 84,999, आणि 99,999 रुपयांना उपलब्ध होईल. रोडस्टर X ही तीनही प्रकारच्या बाईकमधील सर्वाधिक वेगवान बाईक असणार आहे. 4.5 kWh बॅटरी प्रकारातील रोडस्टर X बाईक 0-40 KMPH चा वेग गाठण्यासाठी अवघी 2.8 सेकंद लागतील.
ओलाचे संस्थापक भविष अगरवाल यांनी ही बाईक बाजारात आणत असल्याचे जाहीर केले. या बाईकसाठीच्या बुकींगना सुरुवात झाली असून बाईकची डिलिव्हरी जानेवारी 2025 पासून मिळण्यास सुरुवात होईल असे अगरवाल यांनी सांगितले. 'रोडस्टर प्रो' ही या बाईकच्या तीनही प्रकारातील सर्वात महागडी बाईक असून या बाईकची डिलिव्हरी मिळण्यास दिवाळी 2025 पासून सुरूवात होईल असे अगरवाल यांनी सांगितले. देशभरातील 100 हून अधिक केंद्रावर या बाईकची टेस्ट राईड घेता येईल असे अगरवाल म्हणाले.
या बाईकचे लाँचिंग करण्यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी ओलाने त्यांचा IPO बाजारात आणला होता. ओला ही शेअर बाजारात पाऊल ठेवणारी पहिली भारतीय ईव्ही कंपनी आहे. 2021 साली ओलाने त्यांची Ola S1 Pro ही बाईक बाजारात आणली होती.