'एक देश, एक निवडणूक' विधेयकासाठी 2 वेळा मतदान, विरोधात किती मतं पडली?

अखेर आज लोकसभेत एक देश, एक निवडणूक विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

अखेर आज लोकसभेत एक देश, एक निवडणूक विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. कायदे मंत्री अर्जुन राघ मेघवाल यांनी लोकसभेत हे विधेयक सादर केले. यानंतर विरोधकांकडून गदारोळ सुरू झाला होता. लोकसभेत पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक मशिनने मतदान झालं. लोकसभेत एक देश, एक निवडणूक विधेयक मंजूर करण्यात आलं.

नक्की वाचा - One nation One Election Bill : एक देश, एक निवडणूक विधेयक लोकसभेत सादर होताच गोंधळ, काँग्रेसकडून तीव्र विरोध 

विधेयकाच्या समर्थनार्थ 269 आणि विरोधात 198 मतं देण्यात आली. यावेळी 369 सदस्यांनी मतदान केलं. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप नोंदवला. यावर कोणाचा आक्षेप असेल तर त्यांना चिठ्ठी देता येईल असंही गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ज्यांना आक्षेप आहे ते चिठ्ठीने मतदान करू शकतात. 

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकसभेत पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक मतदान झालं. विधेयकावर चर्चा केल्यानंतर झालेल्या पहिल्या मतदानात विधेयकाच्या समर्थनार्थ 220 खासदारांनी मतं दिली. त्यावेळी 149 खासदारांनी याचा विरोध केला. यानंतर पुन्हा एकदा मतदानाची प्रक्रिया पार पडली.