ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून पाकिस्तानकडून भारताच्या सीमेभागात हल्ले सुरूच आहेत. 8 मेच्या मध्यरात्रीतही पाकिस्तानने अनेक भागात ड्रोन हल्ले केले. भारतीय सैन्याने पाकिस्तानचा प्रत्येक डाव उधळून लावला आहे. दरम्यान 8 मेच्या मध्यरात्री पाकिस्तानची सीमा ओलांडत भारतात तब्बल 7 दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी त्यांना ठार करण्यास भारतीय (BSF) सीमा सुरक्षा दलाला यश आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री पाकिस्तानकडून पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारताने हे ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावले आणि सीएफव्हींना योग्य प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्य राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व नापाक योजनांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असं ट्विट इंडियन आर्मीकडून करण्यात आलं होतं.
नक्की वाचा - India Pakistan News : भारताच्या सीमा भागात रात्रीच्या अंधारात काय घडलं? भारतीय सैन्याने शेअर केला Video
दरम्यान पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात उरी आणि राजौरीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. दुकानांसह घरंही उद्धवस्त झाली आहेत. नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सकाळपासून याठिकाणी पडलेला ढिगारा हलवण्याचं काम सुरू आहे. बारामुल्लाहमध्येही पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले होते. त्यानंतर बेचिराख झालेल्या घरांची दृश्यं समोर आली आहेत
महत्त्वाचे मुद्दे...
- जम्मू काश्मीरसह लेहमधील सर्व शाळा बंद, पुढील जोन दिवस आदेश येईपर्यंत शाळांना सुट्टी, तर उत्तराखंडमधील सर्व रुग्णालय हाय अलर्टवर
- मुंबईत मच्छिमारांसोबत नौदल अधिकाऱ्यांच्या बैठका, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना, नौदलानं आखलेल्या भागात शूट टू किलचे आदेश
- मुंबईत ठिकठिकाणी सुरक्षाव्यवस्था चोख, गिरगाव चौपाटीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी
- भारत आणि पाकिस्तानच्या वादात पडणार नाही, भारत-पाक तणावावर अमेरिकेची भूमिका, तर अणुयुद्ध होऊ नये अशी उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी मांडली