काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड उगारत भारतीय सैन्याने 7 मे रोजी पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. यानंतर पाकिस्तानने पूर्ण देशात रेड अलर्ट घोषित केला आहे. यासह पाकिस्तानने सर्व शासकीय रुग्णालयांना आपत्कालीन स्थितीत तयार राहण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने 10 मेपर्यंत नऊ शहरातील सर्व उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
येथील विमानं 10 मेपर्यंत रद्द...
जम्मू काश्मीर
जोधपूर
अमृतसर
चंदीगड
राजकोट
भुज
श्रीनगर
लेह
जामनगर
नक्की वाचा - Operation Sindoor नंतर दुसऱ्या दिवशी पाककडून कुपवाडामध्ये गोळीबार, भारतीय सैन्याकडून सडेतोड प्रत्युत्तर
भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी छावण्यांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर, स्पाइसजेट आणि इतर विमान कंपन्यांनी भारताच्या उत्तरेकडील अनेक विमानतळांसाठी उड्डाणासंबंधित नियमावली जारी केली होती. 7 मे च्या दिवसभर अनेक ठिकाणी विमान उड्डाणं रद्द करण्यात आली होती. एअर इंडियाने मात्र 10 मे पर्यंत या ठराविक विमानतळं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या विमानतळांवरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या एअर इंडियाची उड्डाणे 10 मे रोजी सकाळी 05:29 पर्यंत रद्द करण्यात येत आहेत. ही विमानतळे बंद करण्याच्या सूचना विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.