भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी छावण्यांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर, स्पाइसजेट आणि इतर विमान कंपन्यांनी भारताच्या उत्तरेकडील अनेक विमानतळांसाठी उड्डाणासंबंधित नियमावली जारी केली आहे. एअर इंडिया आणि इंडिगोने यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आधीच यासंदर्भातील अपडेट तपासून घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुढील सूचना मिळेपर्यंत धर्मशाळा, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसर येथील विमानतळ बंद राहतील असे विमान कंपन्यांनी सांगितले. त्यांनी असंही सांगितले की, विमानांचे प्रस्थान आणि आगमन याशिवाय इतर उड्डाणांवरही परिणाम होईल. स्पाईस जेटने केलेल्या ट्विटनुसार, लेह, श्रीनगर, जम्मू, कांग्रा, कांडला आणि अमृतसर या ठिकाणांहून सुटणाऱ्या आणि या ठिकाणांहून निघणाऱ्या 7 मे रोजीची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
दिलेल्या मार्गावरील प्रवासी रिफंडसाठी अप्लाय करू शकतात किंवा पुढील तारखेचं बुकिंग करू शकतात, असं स्पाइस जेटकडून सांगण्यात आलं आहे. दिल्ली विमानतळावर जाणारी 20 विमानं रद्द करण्यात आली असून देशाच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे जाणारी सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया आणि एअर इंडियाची अनेक विमानं रद्द करण्यात आली आहेत.
याशिवाय पठाणकोट, अमृतसर आणि अंबाला विमानतळ रिकामे करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय, पुढील ७२ तासांसाठी येथील शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. बिकानेर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि गैर सरकारी शाळा आज बंद राहतील.
एअर इंडियाच्या विमानांवरही परिणाम...
जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या विमानतळांवरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या एअर इंडियाची उड्डाणे 10 मे रोजी सकाळी 05:29 पर्यंत रद्द करण्यात येत आहेत. ही विमानतळे बंद करण्याच्या सूचना विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.