भारत आणि पाकिस्तानदरम्यान शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्री असलेला तणाव शिगेला पोहोतला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानच्या चार एअरबेसवर नष्ट केले आहेत. न्यूज एजन्सी ANI ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. भारताने केलेल्या कारवाईत जम्मूजली पाकिस्तानी पोस्ट आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. येथून ड्रोन हल्ला केला जात असल्याची माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानने शुक्रवारी रात्री 7.47 ते रात्री 10.57 दरम्यान जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या 26 शहरांमध्ये मोठ्या संख्येने ड्रोन दागले होते. हे हल्ले आर्मीने हाणून पाडले आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय आज सकाळी 10.30 वाजता एक पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये भारतीय ऑपरेशनची माहिती दिली जाऊ शकते.
नक्की वाचा - India-Pakistan tension : भारत पाकिस्तान तणावादरम्यान मोठा निर्णय, 32 विमानतळं 15 मेपर्यंत बंद; ही आहे संपूर्ण यादी!
पाकिस्तानने शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात केलेले हल्ले भारताने परतवून लावले आहेत. राजोरी, पुंछ आणि जम्मूमुळे गोळीबार करण्यात आली होती. राजोरीच्या सरकारी अधिकाऱ्यांसह पाच जणांचा यात मृत्यू झाला आहे.