भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या दणक्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने भारताला डिवचण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानकडून हल्ले सुरु आहेत ज्याला भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्यूत्तर दिले आहे. भारताच्या लष्कराकडून पाकिस्तानचा समाचार घेणे सुरुच असून आता बीएसएफने आणखी एक मोठी कारवाई केली आहे ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. बीएसएफने पाकिस्तानातील सियालकोटमधील दहशतवादी लाँच पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. बीएसएफने या कारवाईचा व्हिडिओही जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये बीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानमधील हे लाँच पॅड कसे उद्ध्वस्त झाले आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारानंतर बीएसएफने ही कारवाई केली आहे.
पाकिस्तानच्या सियालकोटमधील हे तेच लाँच पॅड होते जिथून पाकिस्तान भारतीय सीमेत दहशतवादी पाठवत असे. या लाँच पॅड्सच्या विनाशामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तान संतापला आहे. यामुळेच तो नियंत्रण रेषेला लागून असलेल्या गावांवर सतत गोळीबार करत आहे ज्याला भारतीय सैन्यही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे.
>ट्रेंडिंग बातमी - Ratnagiri news: पाकिस्तान जिंदाबादचे स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला चोप, रत्नागिरीतली घटना
दरम्यान, शुक्रवारी बीएसएफच्या या कारवाईत सात दहशतवादी ठार झाले होते. बीएसएफने आता या कारवाईबाबत एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानमधून दहशतवादी कसे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहता येते. पण सीमेवर उपस्थित असलेल्या आपल्या सैन्याने त्यांना तिथेच ठार मारले.
नक्की वाचा - India Pakistan News : पाकिस्तानला मिळालं IMF कडून कर्ज? तब्बल 1 अब्ज डॉलर मिळाल्याचा पाकिस्तानच्या पीएमचा दावा