Operation Sindoor: अखेर सत्य समोर! भारताकडून 20 नव्हे 28 क्षेत्र उद्ध्वस्त, पाकिस्तानची कबुली!

भारतीय लष्कराच्या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाला नसल्याचा दावा करत होता. मात्र आता पाकिस्तानच्या अधिकृत कागदपत्रामधून महत्त्वाचा खुलासा झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

पाकिस्तान: ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल जगभरातून भारतीय सैनिकांचे कौतुक केले जात आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने प्रथम फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, परंतु जेव्हा पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना सैन्याने चोख प्रत्यूत्तर दिले. मात्र आडमुठा पाकिस्तान भारतीय लष्कराच्या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाला नसल्याचा दावा करत होता. मात्र आता पाकिस्तानच्या अधिकृत कागदपत्रामधून महत्त्वाचा खुलासा झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या अधिकृत कागदपत्रातून असे उघड झाले आहे की ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने त्या पाकिस्तानी तळांवरही हल्ला केला, ज्याची माहिती लष्कराने दिली नव्हती. पाकिस्तानच्या ऑपरेशन बन्यान अन मार्कोसवरील कागदपत्रात असे म्हटले आहे की भारताने नमूद केलेल्या तळांपेक्षा कमीत कमी 8 जास्त तळांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी कागदपत्रात दिलेल्या नकाशात पेशावर, झांग, सिंधमधील हैदराबाद, पंजाबमधील गुजरात, गुजरांवाला, भावलनगर, अट्टोक आणि छोरवरील हल्ले दाखवले आहेत. 

गेल्या महिन्यात झालेल्या हवाई हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत भारतीय हवाई दलाने या ठिकाणांची नावे घेतली नाहीत. म्हणजेच  भारताने 20 नव्हे तर 28 ठिकाणी हल्ले केले होते. यावरून भारताने पाकिस्तानला कसा धडा शिकवला हे स्पष्ट होते.

यापूर्वी, मॅक्सार टेक्नॉलॉजीजने प्रसिद्ध केलेल्या उपग्रह इमेजेसमध्ये ऑपरेशन सिंदूर दरम्यान अचूक हल्ल्यांमुळे झालेले नुकसान उघड झाले होते. पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवरील हल्ल्यात भारताने बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण केंद्र यासह नऊ ठिकाणी हल्ला केला होता. 7 मे रोजी झालेल्या हल्ल्यांमध्ये लक्ष्य केलेल्या इतर ठिकाणांमध्ये मुझफ्फराबाद, कोटली, रावलकोट, चकस्वरी, भिंबर, नीलम व्हॅली, झेलम आणि चकवाल यांचा समावेश होता.

Advertisement

नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : प्रेमाची शिक्षा केवळ दु:ख अन् छळ; माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधून शरीरावर चटके

7 मे रोजी झालेल्या हल्ल्यानंतर, भारताने आग्रह धरला होता की त्यांनी फक्त दहशतवादी अड्डे लक्ष्य केले आहेत, परंतु पाकिस्तानने भारताच्या पश्चिम भागातील निवासी क्षेत्रे आणि लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. भारताने पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले. भारताकडून 11 हवाई तळांवर हल्ला करण्यात आला - ज्यात नूर खान, रफीकी, मुरीद, सुक्कुर, सियालकोट, पसरूर, चुनियान, सरगोधा, स्कारू, भोलारी आणि जेकबाबाद यांचा समावेश होता. मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे पाकिस्तानकडे युद्धबंदी करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यामुळे तीन दिवसांचा तणाव संपला.

भारताने आग्रह धरला होता की ऑपरेशन सिंदूरने शत्रूला संदेश दिला आहे की कोणतीही नापाक कृती खपवून घेतली जाणार नाही. भारतातील कोणत्याही दहशतवादी कृत्याला आता युद्ध म्हणून पाहिले जाईल आणि त्याला सर्वात कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. अलिकडच्या संघर्षादरम्यान भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे. पाकिस्तानच्या कागदपत्रांवरून असेही दिसून येते की भारताने कबूल केल्यापेक्षा खूपच खोलवर आणि कठोर हल्ला केला आहे.

Advertisement

Pune Crime: विमानाने पुण्यात यायचे, ज्येष्ठांना टार्गेट करुन 'असे' लुटायचे, 2 चोरटे गजाआड