Operation Sindoor Live Updates: पहलगाम हल्ल्याच्या उत्तरार्थ भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याचे दिसत आहे. 8 आणि 9 मेच्या रात्री पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केले. मात्र भारतीय सैन्याने हे सर्व हल्ले परतवून लावले. अशातच आता शनिवारी रात्री पाकिस्तानकडून सीमा भागातील नागरी वस्त्यांना लक्ष करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या जोरदार प्रतिहल्ल्यानंतर बावचळलेल्या पाकिस्तानने सीमा भागातील नागरी वस्त्यांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानकडून शनिवारी रात्री जम्मू काश्मीर तसेच उरी भागातील अनेक नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानच्या या गोळीबारामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील उरी येथील घरे आणि मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पाकिस्ताननने भ्याड कृत्य केले आहे. ते नागरिकांवर हल्ला करत आहेत, मग ते मुस्लिम असोत, हिंदू असोत किंवा शीख असोत...मी घरात झोपलो होतो तेव्हा अचानक स्फोट झाला आणि काचेच्या काचा फुटल्या...आमच्या सर्व वाहनांचे नुकसान झाले, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
त्याचबरोबर पाकिस्तानने शंभू मंदिरावरही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. शंभू मंदिराचे मुख्य द्वार आहे जिथे लोक सकाळी लवकर प्रार्थना करण्यासाठी येतात, पण सायरन वाजला होता, त्यामुळे येथे कमी लोक होते. पाकिस्तानला योग्य उत्तर दिले जाईल,अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
( नक्की वाचा : पाकिस्तानी नागरिकांनं काढले स्वत:च्याच देशाचे वाभाडे, Video पाहून प्रत्येक भारतीय होईल खुश )
जम्मूजवळ तैनात असलेल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड नष्ट केल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान, भारतीय लष्कर पाकिस्तानला योग्य उत्तर देत आहे. लष्कराच्या या कारवाईबाबत सकाळी १० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली जाईल. दरम्यान, पाकिस्तानी गोळीबारात प्रशासकीय अधिकारी राज कुमार थप्पा शहीद झाल्याची दुर्दैवी बातमीही समोर आली आहे. राजकुमार थप्पा यांच्या निधनानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दुःख व्यक्त केले.