Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोफिया कुरैशी-व्योमिका सिंहची सोशल मीडियावर चर्चा; भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या दोन्ही महिला अधिकाऱ्यांची चर्चा होत आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती त्यांचं कौतुक करीत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

22 एप्रिल रोजी लश्कर-ए-तैयबाने काश्मीरातील  पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात तब्बल 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या घटनेचा देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. अखेर भारतीय सैन्याने याचा बदला घेतला. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने पीओके आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवरील  21 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली.

आज 7 मे रोजी  सुरक्षा दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी 6 मेच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली. दोघीही भारतातील नारी शक्तींचं प्रतीक ठरल्या आहे. सोशल मीडियावर दोघींवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याची ताकद आणि त्यांचा पराक्रम जगासमोर ठेवला. सोबत भारतीय सैन्य पाकिस्तान आधार देणारा दहशतवाद कशा प्रकारे संपवत आहे, हेदेखील सांगितल.

नक्की वाचा - Operation Sindoor नंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, Google वर राफेलची किंमत करतायेत सर्च

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या दोन्ही महिला अधिकाऱ्यांची चर्चा होत आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती त्यांचं कौतुक करीत आहे. एक्सवर सोफिया कुरेशी ट्रेंड करीत आहे. कुरेशी या एक मुस्लीम महिला भारतीय सैन्याची ताकद जगसमोर मांडत होती. याशिवाय सोशल मीडियावर नारी शक्ती देखील ट्रेंड करीत आहे. 

Advertisement

कोण काय काय म्हणालं?

भारताच्या लेकी...


दोन महिला, श्रद्धा वेगवेगळ्या, मात्र मिशन एक - हा आहे खरा भारत

#ऑपरेशनसिंदूर हे जगासाठी शक्ती, त्याग आणि शक्तीचे प्रतीक आहे.