OYO Hotel Booking : OYO मध्ये अविवाहित जोडप्याला NO Entry; Check-in पॉलिसीमध्ये मोठे बदल

ऑनलाइन हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म OYO ने आपल्या चेकइन पॉलिसीमध्ये मोठे बदल केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऑनलाइन हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म OYO ने आपल्या चेकइन पॉलिसीमध्ये मोठे बदल केले आहेत. नव्या बदलाअंतर्गत आता अविवाहित जोडप्यांना OYO मध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे नवी पॉलिसी?
नव्या पॉलिसीअंतर्गत आता सर्व जोडप्यांना चेक-इन करताना वैध ओळखपत्र आणि लग्नाचा पुरावा देणारं कागदपत्र दाखवावं लागेल. ही बुकिंग ऑनलाइन असली किंवा सरळ हॉटेलमध्ये जाऊन करावयाची असेल तरीही जोडप्यांना ही कागदपत्रं द्यावी लागतील. सोबतच OYO ने आपल्या पार्टनर हॉटेलांना हे अधिकार देण्यात आले आहेत. पुरेशी कागदपत्र नसल्यास अशा जोडप्यांचं बुकिंग रद्द केलं जाऊ शकतं.  सुरुवातीला उत्तर प्रदेशातील  मीरतमध्ये ही पॉलिसी लागू करण्यात आली आहे. 

नक्की वाचा - Ambulance in 10 minutes : अवघ्या 10 मिनिटात रुग्णवाहिका तुमच्या दारी, Blinkit ने सुरू केली नवी आपत्कालीन सेवा

Advertisement

का घेतला हा निर्णय?
OYO च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना स्थानिकांनी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडून तक्रारी आल्या होत्या. OYO उत्तर भारत विभागाचे प्रमुख पावस शर्मांनी सांगिकलं की, समाजात कायदा सुव्यवस्था राहावी याची आमच्यावरही जबाबदारी आहे. नव्या बदलाचीही वेळोवेळी समीक्षा करण्यात येईल. प्राथमिक पातळीवर मीरतमध्ये ही पॉलिसी राबवली जाणार आहे. मीरतमध्ये ही पॉलिसी यशस्वी झाली तर इतर शहरांमध्येही हे बदल लागू केले जातील. सोबतच OYO ने अन्य सुधारणात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे.