पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत. भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर अल्पकालीन व्हिसावर भारतात आलेले पाकिस्तानी आणि पाकिस्तानात गेलेले भारतीय यांच्या परत येण्याची अंतिम मुदत संपली आहे. अंतिम मुदत संपताच अमृतसरमधील वाघा-अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पण सीमा बंद असतानाही पाकिस्तानकडून एक लाजिरवाणी गोष्ट समोर आली आहे. ज्यामुळे पाकिस्तानच्याच काही नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतात असलेले पाकिस्तानी नागरीक पाकिस्तानात जाण्यासाठी निघाले. पण पाकिस्तानने त्यांच्यासाठी आपले दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे अनेकजण मध्येच अडकले होते. गुरुवारी पाकिस्तानने अटारी बॉर्डरचे गेट उघडले नाहीत. त्यामुळे अल्पकालीन व्हिसावर भारतात आलेले पाकिस्तानी नागरिक जे आपल्या घरी परत जात होते, ते अटारी-वाघा बॉर्डरवर अडकले आहेत. पाकिस्तानकडून बॉर्डरचे गेट न उघडल्यामुळे अनेक लोक अटारी आणि वाघा बॉर्डरच्या दरम्यान कडक उन्हात गेट उघडण्याची वाट पाहात बसले होते.
आता अटारी-वाघा बॉर्डर पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अल्पकालीन व्हिसा असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीमा बंद करण्यात आली. एका आठवड्यापर्यंत लोकांची मोठी गर्दी झाल्यानंतर हे बंद करण्यात आले आहे. गुरुवारी दोन्ही देशातून कोणतीही व्यक्ती सीमा ओलांडू शकला नाही. बुधवारी 125 पाकिस्तानी नागरिक परतले होते. गेल्या सात दिवसांत देश सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची एकूण संख्या 911 आहे.
ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: चुन-चुन कर मारेंगे! अमित शाहंनी दहशतवाद्यांना ठणकावले
तर 152 भारतीय नागरिक बॉर्डर क्रॉस करून परत भारतात आले आहेत. केंद्रा सरकारने 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकाची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना ‘भारत सोडण्याचे' आदेश दिले होते. आता दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या काही नागरिकांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.