पंजाब: पंजाब पोलिसांनी मोठी कामगिरी करत अमृतसरमध्ये मोठे गुप्तहेर प्रकरण उघडकीस आणले आहे. या कारवाईत पाकिस्तानी गुप्तचर संस्शा असलेल्या ISIशी संबंधित दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या दोघांनी लष्करी छावण्या आणि एअरबेसच्या छायाचित्रांचा शत्रूला पुरवठा केल्याचे समोर आले असून तपासामध्ये आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एका मोठ्या कारवाईत, पंजाब पोलिसांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित एका हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्या गंभीर आरोपाखाली पोलिसांनी अमृतसर येथून पलक शेर मसीह आणि सूरज मसीह या दोन संशयितांना अटक केली आहे. तपासात असे दिसून आले आहे की दोन्ही आरोपींनी भारतीय लष्करी छावण्या, हवाई तळ आणि इतर मोक्याच्या ठिकाणांचे फोटो आणि माहिती शत्रू देशाला दिली. तुरुंगात बंद असलेल्या गुंड हरप्रीत सिंग उर्फ पिट्टू उर्फ हॅपीच्या नेटवर्कद्वारे ही सर्व माहिती आयएसआयला पाठवली जात होती.
पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अटक केलेले आरोपी एका संघटित हेरगिरी टोळीशी संबंधित आहेत, जी सोशल मीडिया आणि बनावट कागदपत्रांद्वारे लष्करी तळांवर प्रवेश करून संवेदनशील माहिती गोळा करत होती. या संपूर्ण प्रकरणात अधिकृत गुपिते कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Badlapur News : बदलापूरकरांच्या डोक्याला 'ताप'; रेल्वेच्या तिकीट खिडकीमुळे मनस्ताप
पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी सोशल मीडियाद्वारे या कारवाईची पुष्टी केली आणि सांगितले की, पंजाब पोलिस कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांना सोडणार नाहीत. ही एक निर्णायक कारवाई आहे आणि तपास सुरू आहे. येत्या काळात आणखी मोठे खुलासे होऊ शकतात. या खुलाशामुळे राज्यभरातील सुरक्षा यंत्रणांची सतर्कता वाढली आहे आणि गुप्तचर विभागाकडून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पंजाब पोलिसांचे हे यश देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
नक्की वाचा - Crime News : पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं; काय आहे प्रकरण?