Pakadva Vivah : रेल्वेत नोकरी लागल्यानंतर प्रेयसीशी लग्न करण्यास नकार दिलेल्या तरुणाचं जबरदस्तीनं लग्न लावण्यात आलं आहे. याबबाबत मिळालेल्या माहितीनुसार तरुणाला काही दिवसांपूर्वी रेल्वेमध्ये नोकरी लागली होती. नोकरी लागताच तो त्याच्या प्रेयसेलीला विसरला. त्या दोघांचं दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं. पण नोकरी मिळाल्यानंतर त्यानं लग्न करण्यासाठी हुंड्याची मागणी केली. त्यावेळी तरुणीच्या नातेवाईकांनी दोघांचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. या प्रकारच्या लग्नाला 'पकडौआ विवाह' असं म्हणतात. या लग्नाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. प्रमोद कुमार सहनी असं या पीडित तरुणाचं नाव आहे. तर त्याच्या कथित प्रेयसीचं नाव रोशनी कुमारी आहे. हे दोघं एकमेकांचे लांबचे नातेवाईक असल्याचं सांगितलं जातंय. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, अशी माहिती आहे. पण तरुणानं हा दावा फेटाळला आहे. तरुणी लांबची नातेवाईक असल्यानं आमचं कधी-कधी बोलणं होत असे, असं त्यानं सांगितलं.
नोकरी लागल्यानंतर बदललं मन
दुसरिकडं मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद नोकरी लागण्याच्यापूर्वी रोशनीबरोबर लग्न करण्यास तयार होता. पण, रेल्वेत चतुर्थ कर्मचारी म्हणून नोकरी लागताच त्याटचे सूर बदलले. तो लग्न करणे टाळत होता. इतकंच नाही तर हुंड्यासाठी त्यानं 10 लाखांची मागणी देखील करत होता. त्यानंतर मुलीनं त्याला भेटण्यासाठी विद्यापतीधाम मंदिरात बोलावलं. तिथं मुलगी आधीपासूनच नवरीच्या वेषात होती. मुलीच्या नातेवाईकांनी त्याला तब्बल पाच तास समाजावले. त्यानंतरही तो तयार नसल्यानं त्याचा जबरदस्तीनं 'पकड़ौआ विवाह' करुन दिला.
( नक्की वाचा : रवीना टंडनवर झालेला हल्ला होता नियोजनबद्ध कटाचा भाग, अभिनेत्रीनं केला धक्कादायक गौप्यस्फोट )
या विषयावर नवरी मुलगी रोशनीनं NDTV शी बोलताना सांगितलं की, 'आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. पण नोकरी लागल्यानंतर तो कधी तिलकसाठी 10 लाख रुपये आणि बुलेटची मागणी करत असे. तर कधी लग्न करण्यास नकार देत असे. पण तो आता तयार झाला आहे. तर 'मला खोटं बोलून आणलं होतं' असं प्रमोदनं सांगितलं. मुलीशी प्रेम असल्याचा दावा देखील त्यानं फेटाळला आहे. आमचं कधी-कधी बोलणं होत असे पण याचा अर्थ आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो असा नाही, असा दावा प्रमोदनं केला आहे.