जाहिरात

रवीना टंडनवर झालेला हल्ला होता नियोजनबद्ध कटाचा भाग, अभिनेत्रीनं केला धक्कादायक गौप्यस्फोट

Raveena Tandon : चित्रपट अभिनेत्री रवीना आणि तिच्या ड्रायव्हरवर जून महिन्यात मुंबईत एका जमावानं हल्ला केला होता. रवीनानं त्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

रवीना टंडनवर झालेला हल्ला होता नियोजनबद्ध कटाचा भाग, अभिनेत्रीनं केला धक्कादायक गौप्यस्फोट
मुंबई:

चित्रपट अभिनेत्री रवीना आणि तिच्या ड्रायव्हरवर जून महिन्यात मुंबईत एका जमावानं हल्ला केला होता. खराब ड्रायव्हिंगचा आरोप करत जमावानं रविनाला लक्ष्य केलं. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अभिनेत्रीवर झालेला तो हल्ला नियोजनबद्ध कटाचा भाग होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट स्वत: रवीनानं केला आहे. NewsX Live, ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये रविनानं मुंबई पोलिसांच्या हवाल्यानं हा गौप्यस्फोट केलाय. या प्रकारची घटना तिची मैत्रीण आणि अभिनेत्री रिचा चड्डाबाबत देखील घडली होती. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्यानं रिचाला हे प्रकरण 'सेटल' करावं लागलं, अशी माहिती देखील रवीना टंडननं दिली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाली रवीना?

रवीना टंडननं या मुलाखतीमध्ये मुंबईत घडत असलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली आहे. 'दुर्दैवानं मुंबईमध्ये हे प्रकार नियोजनबद्ध पद्धतीनं होत आहेत. ही अतिशय भीतीदायक गोष्ट आहे. ही घटना घडली (जमावानं केलेला हल्ला) त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी मैत्रिण रिचानं मला सांगितलं, 'रवीना तुला विश्वास बसणार नाही पण माझ्याबाबतीत देखील हे घडलंय.' 

रिचाबाबत देखील हाच प्रकार घडला. दुर्दैवानं तिथं सत्य सांगण्यासाठी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. तिला हे प्रकरण मिटवण्यासाठी पैसे द्यावे लागले. पोलिसांनीच तिला हे प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिनं पैसे देऊन हे प्रकरण मिटवलं, असं रविनानं सांगितलं.  

हार्दिकसोबतच्या घटस्फोटातनंतर नताशानं सुरु केलं काम, कृणाल पांड्याची प्रतिक्रिया Viral

( नक्की वाचा : हार्दिकसोबतच्या घटस्फोटातनंतर नताशानं सुरु केलं काम, कृणाल पांड्याची प्रतिक्रिया Viral )

जमावानं घरात घुसण्याचा प्रयत्न केला

रवीना टंडनवर झालेला हल्ला देखील पैसे घेण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं झाला होता, असा दावा अभिनेत्रीनं मुंबऊई पोलिसांच्या हवाल्यानं दिला होता. 'माझ्या बाबतीत जो प्रकार घडला त्यामध्ये देखील कदाचित ते मला धमकावण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना प्रकरण शांत करण्यासाठी पैसे देईन. मला आठवतंय की जमाव अत्यंत आक्रमक बनला होता.

ते माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. माझी मुलं घरात होती. माझा नवरा त्यावेळी घरी नव्हता. माझ्या घरातले जे पुरुष कर्मचारी त्यांना दिसले त्यांना ते ओढत होते. त्यांना मारत होचते. त्यानंतर मी गेटवर जाऊन उभी राहिले. मी आणि माझ्याकडं अनेक वर्षांपासून काम करणारी कर्मचारी गेटवर उभी राहिली. ते धक्काबुक्की करत होते. ड्रायव्हरला बाहेर पाठवा अशी मागणी करत होते. मी त्यांना ड्रायव्हरची चूक असेल तर पोलिसांना येऊ द्या. तुम्ही न्याय देणारे कोण असा प्रश्न विचार. तुम्ही का मारहाण करत आहात? कृपया कुणाला मारु नका, असं मी त्यांना सांगितलं, अशी माहिती रवीनानं दिली. 

रवीनावर केला होता आरोप

रवीना टंडननं सांगितलेली घटना 1 जून 2024 रोजी घडली होती. रवीना टंडनने मद्यधुंद अवस्थेत आईला मारहाण केल्याचा आरोप मोहम्मद नावाच्या व्यक्तीने केला होता. 'रिझवी लॉ कॉलेजवळ माझ्या आईच्या अंगावर रवीना टंडनच्या ड्रायव्हरने गाडी घातली', असा आरोप मोहम्मदने केला होता. याबाबत विचारणा केली असता रवीनाने आई आणि भाचीला मारहाण केल्याचा आरोपही त्याने केला.

मोहम्मदने आरोप केलाय की, 'रवीना टंडन गाडीतून बाहेर आली आणि तिने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळेस अभिनेत्री मद्यधुंद अवस्थेत होती. माझ्या आई आणि भाचीला इतकी मारहाण केली की त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.'

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com