Republic Day : शत्रू राष्ट्राच्या नेत्यांनीही प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून लावली होती उपस्थिती

Republic Day : गेल्या वर्षी 2024, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी 2023 च्या समारंभात सहभागी झाले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
इस वर्ष इंडोनेशिया के राष्ट्रपति सुबियांतो गणतंत्र दिवस समारोहों में मुख्य अतिथि होंगे.

प्रजासत्ताक दिनी विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यावेळी भारताच्या 76 व्या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे आहेत. प्रजासत्ताक दिनी निमंत्रित करण्यात आलेल्या प्रमुख पाहुण्यांची यादी बरीच मोठी असून या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचेही नाव आहे. इतकेच नाही तर एक वेळ अशी होती की भारताने आपल्या 'शत्रू' देश पाकिस्तान आणि चीनच्या नेत्यांना प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.

1955 च्या प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानचे तत्कालीन गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मुहम्मद हे प्रमुख पाहुणे होते. 1955 मध्ये प्रथमच प्रजासत्ताक दिनाची परेड राजपथवर काढण्यात आली आणि तेव्हापासून ते प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे ठिकाण बनले. यानंतर 1965 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणेही पाकिस्तानचेच होते. पाकिस्तान सरकारचे अन्न आणि कृषी मंत्री राणा अब्दुल हमीद हे प्रमुख पाहुणे होते. त्याचप्रमाणे 1958 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मीचे मार्शल येन जियानिंग यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे

गेल्या वर्षी 2024, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी 2023 च्या समारंभात सहभागी झाले होते. 2021 आणि 2022 मध्ये कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे नव्हते. 

2020 मध्ये, ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्रपती जैर बोल्सोनारो प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते. 2019 मध्ये, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे प्रमुख पाहुणे होते, तर 2018 मध्ये, सर्व 10 ASEAN देशांचे नेते समारंभाला उपस्थित होते.

Advertisement

2017 मध्ये, अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान हे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. तर 2016 मध्ये, फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइस ओलांद समारंभाला उपस्थित होते. 2015 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे होते. 2014 मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे हे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.