पाकिस्ताननं जम्मू काश्मीर तसंच राजस्थानमध्ये ड्रोन हल्ला केला आहे. जम्मू काश्मीरमधील जम्मू आणि कुपवाडा तसंच राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला. पण, भारतीय सुरक्षा दलानं हा हल्ला निष्फळ ठरवला. या हल्ल्यानंतर जम्मू, कुपवाडा तसंच जैसलमेरमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती, वाचा ताजे अपडेट
पाकिस्ताननं जम्मू काश्मीरसह पंजाब आणि राजस्थानमध्येही ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व हल्ले भारतानं निष्फळ ठरवले आहेत.
- जम्मूमध्ये सायरन वाजल्यानं ब्लॅकआऊट
- पाकिस्तानचा ड्रोन हल्ला करण्याचे प्रयत्न निष्फळ
- एअर डिफेन्स सिस्टमकडून हल्ला निष्फळ
- जम्मूवर हल्ला करणारे सर्व ड्रोन पाडले
- जम्मू, उधमपूर, कुपडामध्ये ड्रोन हल्ला
- पंजाबमधील पठाणकोटमध्ये हल्ल्याचा प्रयत्न
- पाकिस्तानकडून सीमाभागात मोठ्या प्रमाणात गोळीबार
- राजस्थानमधील जैसलमेर, बारमेरमध्येही ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न
- नागरिकांना घरात राहण्याचे आदेश
यापूर्वी पाकिस्तानकडून भारतामधील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता. पण, भारतानं तो प्रयत्न हाणून पाडला आहे. भारतानं उत्तर देताना केलेल्या कारवाईत लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे नष्ट केली आहे.
आज सकाळी भारतीय सशस्त्र दलानं पाकिस्तानचे अनेक ठिकाणं तसंच एअर डिफेन्स रडार आणि सिस्टमनं लक्ष्य केलं. पाकिस्ताननं केलेल्या प्रयत्नाला भारतानं चोख उत्तर दिलं. लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे निष्प्रभ करण्यात आले आहेत.