Pakistan firing in Kupwara:ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तानकडून नापाक कृत्य सुरू आहेत. पाकिस्तानकडून वारंवार उकसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या दिवशीही जम्मू-काश्मीरमधील काही भागात गोळीबार केला. पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर सीमेपार गोळीबार केला आहे. कुपवाडामधील करनाह भागात गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. भारतीय सैन्यानेही याचं सडेतोड उत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून मध्यरात्रीनंतर करनाह भागात नागरिकांच्या भागात निशाणा बनविण्यात आला. पाकिस्तानकडून मोर्टार दागण्यात आले. भारतीय सशस्त्र दलाने गोळीबाराला सडेतोड उत्तर दिलं आहे. आतापर्यंत या गोळीबारात कोणत्याही मृत्यूची माहिती मिळू शकलेली नाही. ऑपरेशन सिंदूरंतर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला होता, ज्यानंतर बुधवारी करनाहकडून अधिकांश नागरिकांना सुरक्षित भागात हलविण्यात आले होते.
नक्की वाचा - Shirdi Crime : धार्मिक केंद्र असलेल्या शिर्डीत प्रतिबंधित गुटखा तस्करीचं जाळं; पोलिसांची मोठी कारवाई
दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त झाल्याने पाकिस्तान अस्वस्थ...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि पाकिस्तानात तब्बल 100 किलोमीटर आतपर्यंत दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केली. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सीमेमध्ये न घुसताही जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनेची तळं उद्ध्वस्त केली. भारताच्या या स्ट्राइकमुळे दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. दहशतवादी ठिकाणांवर कारवाईमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे आणि एलओसीवर गोळीबर करीत आहे.