काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात भारतीय सैन्याने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तान सैरभैर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारत सीमा भागावर गोळीबार सुरूच आहे. पाकिस्तानकडून कुरघोडी सुरू असताना भारताकडून त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान शुक्रवारी पाकिस्तान संसदेतील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये खासदार शाहिद खट्टर आपल्याच सरकारला घरचा आहेर देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये खासदारांनी पंतप्रधान शाहबाज यांना भित्रा म्हटलं आहे. ते पुढे म्हणतात, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नावही घेऊ शकत नाहीत. ते घाबरलेत. त्यामुळे आमचे पंतप्रधान सैन्याला काय संदेश देऊ शकेल.
नक्की वाचा - India Pakistan News : आधी मागितलं कर्ज, आता म्हणतायेत अकाऊंट हॅक; पाकिस्तानचं काय सुरू आहे?
गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सर्व योजना उद्ध्वस्त केल्या. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत केवळ 2 F-16 सह पाकिस्तानच्या चार फायटर जेट नष्ट केले आहेत. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम विमान उद्ध्वस्त केलं.