जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, CRPF चा अधिकारी हुतात्मा

जम्मू काश्मीरमधील (Jammu-Kasmir) उधमपूर जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
सुरक्षा दलानं हल्ल्याला उत्तर देताच दहशतवादी पळून गेले. (फाईल फोटो)
मुंबई:

जम्मू काश्मीरमधील (Jammu-Kasmir) उधमपूर जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. उधमपूरमधील बसंतगढ भागात दुपारी सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या  स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीमध्ये सीआरपीएफ (CRPF) चा एक अधिकारी हुतात्मा झाला. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या (Central Reserve Police Force) 187 बटालियनमधील इन्सपेक्टरला गोळी लागली. त्यांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करत असताना मृत्यू झाला.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

संयुक्त टेहाळणी पथकानं या हल्ल्याला उत्तर देताच दहशतवादी फरार झाले. घटनास्थळावर अतिरिक्त तुकडी पाठवण्यात आली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

दहशतवादी घटनांमध्ये वाढ

जम्मू काश्मीरमधील सामान्यत: शांत समजल्या जाणाऱ्या भागात हा हल्ला झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: पीर पंजाल रेंजच्या दक्षिण भागातील घनदाट जंगल आणि पर्वतमय प्रदेशात दहशतवादी घटना वाढल्या आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा : 'ते निश्चित करणे सर्वोच्च न्यायालयाचं काम नाही', ट्रिपल तलाकबाबत केंद्र सरकारनं काय सांगितलं? )
 

उच्चस्तरीय बैठक

जम्मू काश्मीरमध्ये सतत होत असलेल्या दहशतवादी घटनांवर नवी दिल्लीमध्ये एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीचे अध्यक्ष होते. दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित होते. 

महामार्गांना करणार टार्गेट?

जम्मू काश्मीरची लाईफलाईन असलेल्या महामार्गाला टार्गेट करु शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर केंद्र सरकारनं महामार्ग तसंच आसपासच्या भागात गस्त वाढवली आहे. स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या अधिक जवानांची या कामात मदत घेतली जात आहे. 

Advertisement