Parle G biscuit prices reduced : काही पदार्थ असे असतात जे पाहताच लोक नॉस्टॅल्जिक होतात. असे काही पदार्थ पाहताच लहानपणाची आठवण येते. भारतातील सर्वसाधारणपणे सर्व घरांमध्ये आढळलेलं पार्ले-जी बिस्किटाशी लोक भावनिक जोडलेले आहेत. हे बिस्किट पाहताच लहानपणाची आठवण येते. गेल्या काही कालावधीत बिस्किटच्या किमती वाढल्या आहेत. मात्र जीएसटी रेट कमी झाल्यानंतर आता बिस्किटांच्या किमती कमी झाल्या आहेत. याबाबत पार्ले-जीकडून माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच तुमचं आवडतं बिस्किट आता स्वस्त झालं आहे.
बिस्किट किती स्वस्त झालं?
कार कंपन्यांकडून जीएसटी रेट कमी झाल्यानंतर नव्या रेट लिस्ट जारी करण्यात आली आहे. पार्लेचीचं बिस्किट स्वस्त झालं आहे. पार्लेजीच्या किमती हायलाइट करण्यात आल्या आहेत. १०० रुपयांचं ८०० ग्रॅमचं पार्लेजीचं पाकिट आता ८९ रुपयांपर्यंत घसरलं आहे. तर एक हजार ग्रॅम पाकिटाची किंमत १६० रुपयाहून १४२.४० पर्यंत कमी झाली आहे. अशा प्रकारे क्रॅकजॅक, मोनॅको, हाइड अँड सिक आणि इतर बिस्किटांची पाकिटंदेखील स्वस्त दरात उपलब्ध आहेत. बिस्किटांशिवाय पार्ले-जी टॉफी आणि नमकीनसारख्या पदार्थांच्या किमती कमी झाल्या आहेत.
कोणते पदार्थ झाले स्वस्त?
जीएसटी रेटमध्ये बदल झाल्यानंतर बिस्किटचं नाही तर दररोज वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. यामध्ये शॅम्पू, चॉकलेट, न्यूड्स आणि इतर पदार्थांचा समावेश आहे. याशिवाय पाच रुपयांना मिळणाऱ्या बिस्किटाचं पाकिट आता ४.४७ ला मिळणार आहे. ज्यामुळे दुकानदारांमध्ये गोंधळ उडाला आहे. यावर कंपनीच्या मालकांनी सांगितलं की, ग्राहक युपीआय करू शकतात किंवा मोठं पाकिट खरेदी करू शकतात.
किती आहे जीएसटी?
पार्ले-जी सारख्या बिस्किटांवर आधी १८ टक्के जीएसटी वसुल केला जात होता. जो कमी करून आता पाच टक्क्यांपर्यंत आणला आहे. अनेक पदार्थांवर पूर्वी २८ टक्के जीएसटी होता. जो आता १८ टक्के झाला आहे. यामध्ये कार आणि बाईक यासारख्या उपकरणांचा समावेश आहे.