PM Narendra Modi: 'फॅमिली फर्स्ट' हे काँग्रेसचे मॉडेल, PM मोदींचा घणाघात; 'आणीबाणी'वरुन घेरलं

सबका साथ, सबका विकास हे काँग्रेसच्या आकलनाच्या पलीकडे आहे. काँग्रेस पक्ष फक्त एकाच कुटुंबापुरता मर्यादित झाला आहे. फॅमिली फर्स्ट हे काँग्रेसचे मॉडेल आहे,' असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. संसदेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही सभागृहामध्ये धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. फॅमिली फर्स्ट हे काँग्रेसचे मॉडेल आहे तर आमचे मॉडेल नेशन फर्स्ट असल्याचे सांगत जनतेने आमचे विकासाचे मॉडेल स्विकारल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन काँग्रेसला घेरल्याचे पाहायला मिळाले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

  'राष्ट्रपतींचे भाषण आमच्यासाठी प्रेरणादायी होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात विकसित भारताचा संकल्प होता. राष्ट्रपतींनी पुढे जाण्याचा मार्ग दाखवला. दोन्ही सभागृहात चर्चा झाली आणि ज्याला त्यांचे भाषण समजले त्याने ते त्याच्या मनाप्रमाणे स्पष्ट केले. सबका साथ सबका विकास बद्दल बरेच काही सांगितले गेले आहे, त्यात काय अडचण आहे? ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. काँग्रेसमध्ये सबका साथ, सबका विकास शक्य नाही. सबका साथ, सबका विकास हे काँग्रेसच्या आकलनाच्या पलीकडे आहे. काँग्रेस पक्ष फक्त एकाच कुटुंबापुरता मर्यादित झाला आहे. फॅमिली फर्स्ट हे काँग्रेसचे मॉडेल आहे,' असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. 

'जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली. जनतेने आमच्या विकासाच्या मॉडेलला पाठिंबा दिला. काँग्रेस सतत गोंधळ उडवत आहे. निवडणुकीच्या काळात काँग्रेस मतांची पेरणी करत होते. काँग्रेसने जनतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. आम्ही योजनेचा जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सबका साथ, सबका विकासचा नारा प्रत्यक्षात आणला. मात्र काँग्रेसकडून देशात जातीवादाचे विष पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 

नक्की वाचा - Palghar News : पालघरचा 'वाल्मीक कराड' कोण? जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत माजी आमदाराचा संतप्त सवाल

"काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती द्वेष होता आणि त्यांच्याबद्दल किती राग होता हे दाखवणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. दोनदा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी काय केले गेले नाही? काँग्रेसने बाबासाहेबांना कधीही भारतरत्नसाठी पात्र मानले नाही. आज नाईलाजाने काँग्रेसला जय भीम म्हणायला लागते, ज्यामुळे त्यांचे तोंड कोरडे पडते," असा घणाघातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  केला.