मालकाचा मृतदेह दारात, डुग्गूचं विव्हळणं...चालता चालता थांबला तो कायमचा; 15 वर्षांच्या निष्ठेची इमोशनल कहाणी

काही नाती रक्ताने नाही तर भावनांनी बांधली जातात. अशा नात्यांमध्ये कोणत्याही अटी नसतात, कोणताही स्वार्थ नसतो. माणूस आणि त्याच्या पाळीव प्राण्यामधील अतूट नात्याची एक अनोखी कहाणी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

काही नाती रक्ताने नाही तर भावनांनी बांधली जातात. अशा नात्यांमध्ये कोणत्याही अटी नसतात, कोणताही स्वार्थ नसतो. माणूस आणि त्याच्या पाळीव प्राण्यामधील अतूट नात्याची एक अनोखी कहाणी समोर आली आहे. १५ वर्षांपर्यंत आपल्या मालकाची सावली म्हणून राहणाऱ्या डुग्गू नावाचा पाळीव कुत्रा त्या दिवशीही दरवाज्यावर आपल्या मालकाची वाट पाहत होता, ज्या दिवशी ते शेवटचं घरी आले होते.

फरत फक्त एवढाच होता की, यावेळी प्रदीप जैन स्वत:च्या पायांनी नाही तर त्यांचं पार्थिक घराच्या दारात होतं. त्या दिवसाची रात्र डुग्गू अस्वस्थ होता. त्याने शेवटचं आपल्या मालकाला पाहिलं आणि काही वेळात त्यानेही शेवटचा श्वास सोडला.

Advertisement

शेवटच्या श्वासापर्यंत दिली साथ...

ही घटना मध्यप्रदेशातील बैतूलमधील आहे. ६७ वर्षीय प्रदीप जैन यांचा भोपाळमध्ये एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी त्यांचं पार्थिक घरी आलं. येथे कुटुंबीय आणि आप्तेष्ट अंत्यदर्शनासाठी आले होते. घरात शोककळा पसरली होती. मात्र सर्वाधिक अस्वस्थ त्यांचा पाळीव कुत्रा डुग्गू होता.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप जैन यांचं पार्थिव घरी पोहोचताच डुग्गू अस्वस्थ झाला. तो आपल्या मालकाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत होता. तो विव्हळत होता...भुंकत होता. तो स्वत:ला काहीतरी नुकसान पोहोचवेल या भीतीने त्याला एका खोलीत ठेवण्यात आलं. मात्र तरीही तो बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटी असं काही घडलं की कोणीच याचा विचारही केला नसेल.

शेवटचं मालकाजवळ गेला...

अंत्ययात्रा सुरू होण्यापूर्वी कुटुंबाने डुग्गूला आपल्या मालकाच्या अंत्यदर्शनासाठी आणलं. काही वेळ तो त्यांच्या डोक्यावर फिरत होता. त्यानंतर तो एकाच ठिकाणी शांत उभा राहिला. प्रयत्न करूनही तो तेथून हटायला तयार नव्हता. जेव्हा अंत्ययात्रा सुरू झाली तेव्हा तो त्यांच्या मागे मागे जात होता. काही वेळ तो अंत्ययात्रेत चालत होता. मात्र अचानक रस्त्यातच खाली कोसळला आणि अचानक त्याचा श्वास थांबला. कुटुंब एका सदस्याला निरोप देण्यासाठी निघाले होते, पण आता त्यांना त्यांच्या दुसऱ्या सर्वात प्रिय सोबत्याच्या जाण्याची तयारीही करायची होती.

डुग्गूच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. त्यानंतर प्रदीप जैन आणि डग्गू यांचे अंत्यसंस्कार एकत्र झाले. स्मशानभूमीत पोहोचल्यावर प्रदीप जैन यांच्यावर हिंदू पद्धतीनुसार, अंत्यसंस्कार करण्यात आले. तर डग्गूला जवळच दफन करण्यात आलं. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांसाठी हे दृश्य अत्यंत हृदयस्पर्शी होते.

Advertisement