Petrol Diesel: कच्च्या तेलाचे दर 15 डॉलरपर्यंत घसरले, पुणे-मुंबईसह तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल किती स्वस्त?

Petrol Diesel Prices Fall: सरकारी तेल कंपन्यांनी (IOC, HPCL, BPCL) जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती थोड्या कमी झाल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Petrol Diesel Cheaper: पेट्रोल डिझेलचे आजचे दर किती?"

Petrol-Diesel Rates Today: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामाच्या बातमीने आज जगभरातील बाजारपेठांना मोठा दिलासा दिला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर आणि होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा खुली करण्याच्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत ऐतिहासिक घसरण नोंदवण्यात आली आहे. कच्च्या तेलाचे दर एकाच दिवसात 14 ते 20 टक्क्यांनी कोसळले आहेत. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर किती कमी झाले आहेत?

तज्ज्ञांच्या मते कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या दरांवर लगेच होणार नाही. कारण कच्चे तेल वायदे बाजारात खरेदी केले जाते आणि आज ज्या दराने तेल खरेदी केले जाते ते पेट्रोल पंपांपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक घटक प्रभावित होतात. सध्या पेट्रोल डिझेलच्या किमती ज्यामध्ये दररोज बदल होतात, त्यात आज (8 एप्रिल 2026) रोजी थोडा बदल दिसून येत आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर 11 पैशांपासून ते 35 पैशांपर्यंत कमी झाले आहेत.

Advertisement

देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर घसरले

  1. सरकारी तेल कंपन्यांनी (IOC, HPCL, BPCL) जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती थोड्या कमी झाल्या आहेत.
  2. नवी दिल्लीपासून ते पाटण्यापर्यंत अनेक शहरांमध्ये आज तेलाचे दर घसरले आहेत.
  3. सरकारी आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पेट्रोल 29 पैशांनी स्वस्त होऊन 94.41 रुपये आणि डिझेल 34 पैशांनी घसरून 87.47 रुपये प्रति लिटर झाले आहे.
  4. हरियाणातील गुरुग्राममध्येही दिलासा मिळाला असून येथे पेट्रोल 34 पैशांनी घसरून 95.51 रुपये आणि डिझेल 33 पैशांच्या घसरणीसह 87.97 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
  5. बिहारची राजधानी पाटणामध्ये पेट्रोल आज 11 पैशांनी स्वस्त होऊन 105.48 रुपये आणि डिझेल 10 पैशांच्या घसरणीसह 91.72 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.
ब्रेंट क्रूड आणि WTIच्या किमती किती घसरल्या?

युद्धविरामाच्या घोषणेनंतर ब्रेंट क्रूड आणि WTIच्या किमती मोठ्या प्रमाणात कोसळल्या गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेल्या तणावामुळे जे कच्चे तेल गगनाला भिडले होते, ते आज एकाच दिवसात 14 टक्के ते 20 टक्क्यांपर्यंत स्वस्त झाले आहे.

(नक्की वाचा: Parking Law: कोणी घरासमोर गाडी उभी होत असेल तर तुमचे अधिकार काय? सुप्रीम कोर्टाच्या वकिलाने दिली मोठी माहिती)

ब्रेंट क्रूड (Brent Crude) : आंतरराष्ट्रीय मानक असलेल्या ब्रेंट क्रूडचा भाव सुमारे 17 डॉलर्सच्या मोठ्या घसरणीसह 91.88 डॉलर्स प्रति बॅरलवर आला आहे.
WTI क्रूड: डब्ल्यूटीआय क्रूड अमेरिकन क्रूडमध्येही सुमारे 21 डॉलर्सची घट झाली असून ते 91.05 डॉलर्स प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.
होर्मुजची सामुद्रधुनी जिथून जगातील 20 टक्के तेलाची वाहतूक होते ती पुन्हा सुरक्षित झाल्याच्या बातमीने पुरवठ्याची चिंता दूर झाली आहे ज्यामुळे किमतींमध्ये ही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

Photo Credit: NDTV Marathi

(नक्की वाचा: Ceasefire News: खामेनेईंच्या निधनाचा 40 दिवसांचा शोक, याच दिवशी थांबलं युद्ध! इराणमध्ये 9 एप्रिलला घडणार मोठी गोष्ट?)

पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर 

  1. महाराष्ट्र पेट्रोलचे दर 103.54 रुपये ( दरात कोणतेही बदल नाही)
  2. मुंबई: पेट्रोल 104.21 रुपये, डिझेस 92.15 रुपये
  3. पुणे: पेट्रोल 104.04 रुपये, डीजल 90.57 रुपये
  4. नाशिक: पेट्रोल 95.50 रुपये, डीजल 89.50 रुपये
  5. नवी दिल्ली: पेट्रोल 94.72 रुपये, डीजल 87.62 रुपये
  6. कोलकाता: पेट्रोल 103.94 रुपये, डीजल 90.76 रुपये
  7. चेन्नई: पेट्रोल 100.75 रुपये, डीजल 92.34 रुपये
  8. अहमदाबाद: पेट्रोल 94.49 रुपये, डीजल 90.17 रुपये
  9. बंगळुरू : पेट्रोल 102.92 रुपये, डीजल 89.02 रुपये
  10. हैदराबाद: पेट्रोल 107.46 रुपये, डीजल 95.70 रुपये
  11. जयपूर: पेट्रोल 104.72 रुपये, डीजल 90.21 रुपये
  12. लखनौ: पेट्रोल 94.69 रुपये, डीजल 87.80 रुपये
  13. चंदीगड: पेट्रोल 94.30 रुपये, डीजल 82.45 रुपये
  14. इंदुर: पेट्रोल 106.48 रुपये, डीजल 91.88 रुपये
  15. पाटणा: पेट्रोल 105.58 रुपये, डीजल 93.80 रुपये
  16. सुरत: पेट्रोल 95.00 रुपये, डीजल 89.00 रुपये